Dada Bhuse esakal
नाशिक

Dada Bhuse News: शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : जायकवाडीला पाणी सोडण्याचा विषय ऐरणीवर असताना जिल्ह्यातील ओझरखेड, गंगापूर, कडवा व चणकापूर या धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. पालखेड पाटबंधारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दोन आवर्तनांची मागणी लावून धरल्यामुळे त्यांचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २४) कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. (Decision to release water for agriculture by Guardian Minister Dada Bhuse nashik news)

नाशिक जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे रब्बी हंगामासाठी धरणांतून पाण्याचे आवर्तन सोडावेच लागेल, अशी भावना आमदार व शेतकरी प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली. त्यानुसार नाशिक व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी गंगापूर डावा कालव्यातून २० डिसेंबरला पहिले, तर १५ फेब्रुवारीला दुसरे आवर्तन सोडण्यात येईल.

कडवा धरणातून १० डिसेंबरला शेतीसह बिगर सिंचनासाठीही २० दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. ओझरखेड धरणातून ३ डिसेंबरला आवर्तन सोडण्यात येईल. यासाठी निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे, संतोष बोराडे, शंकर शिंदे, माधव शिंदे, सतीश गांगुर्डे यांनी आग्रह धरला. दिंडोरीच्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी नोव्हेंबरमध्येच पाणी सोडण्याचा आग्रह धरला. तर काही शेतकरी डिसेंबरअखेर अवर्तनाची मागणी करत होते.

दोघांचा समन्वय साधत ३ डिसेंबर ही तारीख निश्चित केली. ओझरखेड धरणातील पाणी ६३ किलोमीटरपर्यंत जाणार असून, दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यांतील ५० गावांना त्याचा लाभ होणार आहे. चणकापूरमधूनही पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित नाही.

बैठकीस निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य, पाणीवापर संस्थांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

धरणातून या दिवशी सुटेल पाणी

ओझरखेड : ३ डिसेंबर

गंगापूर (डावा कालवा) : २० डिसेंबर, १५ फेब्रुवारी

कडवा : १० डिसेंबर

चणकापूर : तारीख निश्चित नाही

"आवर्तन सोडताना पाण्याचा अपव्यय होणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती करावी. पिण्यासाठी ऑगस्टअखेर पाणी पुरेल याप्रमाणे नियोजन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा." - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

"पालखेड धरणातून दोन आवर्तनांची मागणी आम्ही केली आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली. दोन दिवसांत जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजन कळवणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल." - अमृता पवार, संचालक, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT