Medical team of the Municipal Corporation while taking action at Shri Balaji Super Specialty Hospital. esakal
नाशिक

Nashik News : भंडारी दांपत्याला पुन्हा नोटीस पाठविण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथील श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशिन सापडल्याने हॉस्पिटलच्या मिळकतीचे मालक व महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी व त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता भंडारी यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल असतानाच न्यायालयात भूमिका स्पष्ट करण्याऐवजी जाहीररीत्या माध्यमांशी संवाद साधून प्रशासनावर टीका करत सेवा नियमावलीचा भंग केल्याने त्यांना पुन्हा एकदा प्रशासनामार्फत नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Decision to send notice to dr Bhandari couple again Nashik News)

श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशिन सापडल्याने, तसेच रुग्णालय विनापरवाना सुरू केल्याप्रकरणी मनपाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी व त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता भंडारी या दोघांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली, तर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात दोघांवर दावा दाखल केला आहे.

परंतु न्यायालयातच भूमिका मांडणे अपेक्षित असताना डॉ. भंडारी दांपत्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा करत पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिका प्रशासनावर टीका केल्याने जाहीररीत्या महापालिका प्रशासनाची बदनामी केली म्हणून त्यांना पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सूडबुद्धीने कारवाई

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व डॉ. प्रशांत शेटे यांनी केलेली कारवाई खोटी आहे. हॉस्पिटलची इमारत आमच्या नावाने असली तरी अनेक वर्षांपासून ती भाडेतत्त्वावर दिली आहे. २०२० मध्ये टू केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पवार व स्वप्नील इंगळे यांना पाच वर्षाच्या करारावर इमारत भाडेतत्त्वावर दिली.

हॉस्पिटलचा करारनामा करण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये असलेले साहित्य, मेडिकल तसेच कारवाईमध्ये आढळलेले सोनोग्राफी यंत्रदेखील हॉस्पिटलच्या संचालकांकडे सुपूर्द केले होते. सोनोग्राफी यंत्र उपयोगाचे नाही. असा अर्ज ७ जानेवारी २००८ ला महापालिकेकडे दिला होता. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.

२०२५ पर्यंत हॉस्पिटल संबंधितांच्या ताब्यात आहे. हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन भंडारी यांच्या नावावर नाही. त्यामुळे झालेली कारवाई खोटी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असल्याचा दावा डॉ. राजेंद्र व सुनीता भंडारी यांनी केला. आमच्या परिवाराला लक्ष करून डॉ. राजेंद्र यांना बदनाम करण्याचा काही लोकांचा मानस आहे, असा आरोपदेखील डॉ. सुनीता यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT