Cloth Business loom esakal
नाशिक

Cloth Business : तयार कापडाच्या मागणीत घट; उत्पादन कपात निर्णयामुळे यंत्रमाग 2 दिवस बंद

सकाळ वृत्तसेवा

Cloth Business : शहरातील यंत्रमाग व्यवसाय सतत तेजी-मंदीचे हेलकावे खात असतो. यंदा रमजानपुर्व यंत्रमाग व्यवसाय जोमात होता. परंतु ईदनंतर लग्नसराईच्या अखेरच्या टप्प्यात बाजारपेठांमध्ये तयार कापडाची मागणी घटली आहे.

यामुळे यंत्रमाग व्यवसाय पुन्हा संकटाच्या फेऱ्यात सापडला आहे. मंदीमुळे तयार कपड्याच्या दरात मीटरमागे ३ रुपयांची घसरण झाली आहे.

दरातील घसरण व मागणीतील कमतरता यामुळे नुकसान टाळण्यासाठी शहरातील बहुसंख्य यंत्रमाग कारखानदारांनी यंत्रमाग दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे यंत्रमाग कृती समितीचे अध्यक्ष युसूफ इलियास यांनी सांगितले. (Decline in demand for finished cloth Loom shut down for 2 days due to production cut decision nashik news)

शहराचे अर्थकारण यंत्रमाग व्यवसायावर अवलंबून आहे. सुमारे अडीच लाख यंत्रमागावर दीड लाख कामगार व पंचवीस हजाराहून अधिक पूरक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. ईदनंतर तयार कपड्यांची मागणी घटली.

त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. परराष्ट्रात कापड निर्यात ठप्प झाल्याने व्यवसायाची स्थिती बिकट झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यामागे कापड निर्मितीवर अंकुश ठेवणे हा देखील हेतू असल्याचेही युसूफ इलियास यांनी सांगितले.

येथील यंत्रमागावर रोज ११ हजार ५०० पॉपलिनच्या कापड गाठी तयार होतात. एका गाठीत ११० मीटरचे १५ ते १७ टाक असतात. एका यंत्रमागावर २४ तासात ८० मीटर कापड तयार होते. शहरात दिवसाला सुमारे २ कोटी मीटर कापड तयार होते.

यासाठी ७५ ट्रक सूत लागते. कापडाची मागणी घटल्याने कारखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. दोन दिवसाच्या बंदमुळे ४ कोटी मीटर कापड निर्मिती घटणार आहे. निर्मिती नियंत्रित झाल्याने मागणी तथा पुरवठा सुरु ठेवून नुकसानीची झळ कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरामध्ये मोठी घट

अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रातील कापड निर्यात पूर्णतः ठप्प आहे. कापड व सूत बाजाराची परिस्थिती खूपच वाईट आहे. पॉपलिन कापड उत्पादनाचे ५० टक्के यंत्रमाग आहेत. ३० टक्के पॉलिस्टर रोटो तर २० टक्के यंत्रमाग फॅब्रिकचे आहेत.

मंदी आल्याने सुताचे दर घसरले आहेत. तेजीत पॉलिस्टरचे सूत १६० रुपये किलो होते. सध्या हे सूत १३० किलो झाले आहे. पीसी सूतही २२५ वरुन २१३, कॉटनचे सूत १६०० रुपये ऐवजी १ हजार ३७० रुपये मिळत आहे.

कॉटन ३० प्रकारचे सूत १३०० वरुन १ हजार २१० रुपये दराने विकले जात आहे. मंदीचा हा विळखा किमान तीन महिने कायम राहील असा अंदाज व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT