onion latest marathi news esakal
नाशिक

पाकिस्तान अन् इराणमधील कांद्यावर पावसाची ‘संक्रांत’

महेंद्र महाजन

नाशिक : आखाती देश, श्रीलंका, बांगलादेशाला कांदा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानसह इराणमधील कांद्यावर पावसाची संक्रांत आली आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला जागतिक बाजारपेठेत चांगला उठाव राहण्याची आशा आहे.

पण भारताकडून धोरणात्मकदृष्ट्या या स्थितीचा किती फायदा उठवला जाणार, यावर सध्याच्या कांद्याच्या कोसळलेल्या भावाच्या सुधारणाचे गणित अवलंबून असेल. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र व मध्य प्रदेशात सद्यःस्थितीत ६० लाख टनाच्या आसपास कांदा शिल्लक आहे.

त्यात कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील १८ लाख टनांहून अधिक उन्हाळ कांद्याच्या समावेशाचा अंदाज कृषी विभागाचा आहे. (decreasing supply of onions in Pakistan and Iran india benefitted Latest Marathi News)

बकरी ईदला कराचीमध्ये एक किलो कांद्याचा भाव ९० ते १०० पाकिस्तान रुपये असा होता. त्यानंतर तो ८० पर्यंत कमी होऊन आता कराचीवासीयांना ६२ रुपये ७१ पैशांना किलोभर कांदा खरेदी करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत भारतीय कांदा पाकिस्तानमध्ये निर्यात होऊ शकतो का? याबद्दलची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याच अनुषंगाने माहिती घेतल्यावर पाकिस्तानने एकतर्फी आयातबंदी घातली असल्याने पाकिस्तानात भारतीय शेतकऱ्यांना थेट कांदा पाठवणे शक्य नाही. आखाती देशामार्गे पाकिस्तानात भारतीय कांदा पाठवला जाऊ शकतो.

मात्र त्यातून वाहतूक खर्च वाढणार असल्याने पाकिस्तानमधील भारतीय कांद्याची किंमत वाढणार आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये डॉलरची गंभीर समस्या निर्माण झाल्याने आखाती देशातील आयातदार पाकिस्तानसाठी कांदा कितपत खरेदी करतील? याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

दुसरीकडे आखाती देशातील बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याचा स्पर्धक राहिलेला नाही. हीच स्थिती इराणच्या कांद्यासंबंधीचीही आहे. सिंगापूर आणि पूर्वोत्तर देशाची बाजारपेठ काबीज केलेल्या हॉलंडमध्ये उष्णतेच्या समस्येमुळे कांद्याचे उत्पादन २० टक्क्यांनी कमी असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे.

सप्टेंबरनंतर नवीन कांदा

इराण, तुर्कस्तान, इजिप्तचा नवीन कांदा सप्टेंबरनंतर बाजारात दाखल होण्यास सुरवात होते. त्यातच, इजिप्तमधील कांद्याचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती निर्यातदारांना मिळाली आहे.

चीनचा नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली असला, तरीही चीनमध्ये कांद्याच्या साठवणुकीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांद्यासह राजस्थानमधील कांदा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशासाठी पुरेसा ठरेल, अशी स्थिती सध्या आहे.

पण त्याचवेळी ऑक्टोबरच्या मध्यानंतर डिसेंबरअखेर अडीच महिन्यांच्या कालावधीत देशाच्या गरजेएवढी कांद्याची आवक कितपत राहील, याबाबत साशंकता आहे. खरीप कांद्याचे उत्पादन चित्रदुर्ग, बागलकोट, कर्नुल या भागात कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

त्याचप्रमाणे राजस्थानसह सातारा, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील खरीप कांद्याचे उत्पादन कमी असण्यासोबत हा कांदा बाजारात दाखल होण्यासाठी वेळ लागण्याची चिन्हे गडद आहेत.

पाकिस्तानची कांदा निर्यात

(जुलै २०२० ते जून २०२१)

० एकूण निर्यात : ३.८२ लाख टन

(मलेशियात-१.२ लाख, श्रीलंकेत ८४ हजार, यूएईमध्ये ७१ हजार, ओमानमध्ये २५ हजार, कतारमध्ये २७ हजार, तर बांगलादेशमध्ये २४ हजार टन)

(स्त्रोत : पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टॅटेस्टिक. संकलन : दीपक चव्हाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT