Deepotsav held in the Mahamrityunjaya temple area of ​​the crematorium esakal
नाशिक

Diwali Festival 2023: येवल्यात स्मशानभूमीत 1008 दिव्यांचा दीपोत्सव!महामृत्युंजय ग्रुपचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

येवला : स्मशानभूमीतील महामृत्युंजय महादेव मंदिर येवलेकरांचे श्रद्धास्थान आहे. याच मंदिरासह स्मशानभूमी परिसरात अंधश्रद्धा न पाळता महामृत्युंजय ग्रुपच्या युवकांनी १००८ दिव्यांचा दीपोत्सव करत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.

विशेष म्हणजे मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली. (Deepotsav of 1008 Diwali Festival 2023 at yeola Crematorium An initiative of Mahamrityunjay Group nashik )

महामृत्युंजय महादेव मंदिरात रोज पहाटे अभिषेक व पूजा होते. सायंकाळीही पूजा-आरती होते. रोज हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. प्रत्येक १५ दिवसांनी येणाऱ्या प्रदोषला होणारी अभिषेक पूजा, तसेच दर्शन व महाप्रसादासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती असते.

किंबहुना प्रदोष पूजा व अन्नदानासाठी पुढच्या अनेक दिवसांच्या तारखा बुक झाल्या आहेत. अनेकांना येथे सकारात्मक अनुभव आल्याचे सांगितले जात असून, दोन वेळेस मंदिरात नागदेवतेने दर्शन दिले आहे.

सर्वत्र दीपावली सण हा विविध पद्धतीने साजरा होत असून, शहरवासीयांचे श्रद्धास्थान बनलेल्या मंदिरात महामृत्युंजय ग्रुपतर्फे आकर्षक सजावट करण्यात आली असून, रोषणाईही केली आहे. स्मशानभूमीमध्ये १००८ दिवे प्रज्वलित करत दीपावली सण साजरा करण्यात आला.

या वेळी महामृत्युंजय महादेव मंदिर, तसेच स्मशानभूमी परिसरात ग्रुपच्या सदस्यांनी दिवे प्रचलित करत फटाक्याची आतिषबाजी करत अंधश्रद्धेला फाटा देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला.

विशेष म्हणजे भक्तांनी दिव्यातून ओम साकारत लक्ष वेधले. दीपावलीचे पाचही दिवस या ठिकाणी दीपोत्सव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT