NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Revenue: महापालिकेच्या महसुलात तूट; उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

NMC Revenue : आर्थिक वर्षातील पाच महिने संपत असताना महसुलात मात्र तूट दिसत आहे. त्यामुळे विकासकामे पूर्ण करताना दमछाक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी दिल्या आहेत.

उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यासाठी समितीदेखील गठित करण्यात आली आहे. (Deficit in NMC revenue Suggestions for finding new income options nashik)

नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक जवळपास दोन हजार चारशे कोटी रुपयांचे आहेत. यातील जवळपास बाराशे कोटी रुपये जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात शासनाकडून प्राप्त होतात.

त्यानंतर घरपट्टी व नगर नियोजन विभागाकडून प्राप्त होणारे विकास शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. पाणीपट्टीतून अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठता येत नाही.

घरपट्टीचे उत्पन्न मुख्यत्वे जानेवारी ते मार्चमध्ये प्राप्त होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एप्रिल, मे व जून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सवलत दिली जात असल्याने घरपट्टीचे एकूण उद्दिष्टाच्या निम्म्याहून अधिक रक्कम याच कालावधीमध्ये प्राप्त होते.

या वर्षी ९० दिवसांमध्ये ११५ कोटी रुपये घरपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाली. मागील पाच महिन्यात पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्टांपैकी जवळपास १६ कोटी रुपये आतापर्यंत प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नगर नियोजन विभागाकडून पाच महिन्यात जवळपास १०० कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते, मात्र जेमतेम २५ कोटी रुपये विकास शुल्क प्राप्त झाले. विकासकामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

परंतु अपेक्षित महसूल प्राप्त होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती उत्पन्नवाढीचा अहवाल आयुक्तांना सादर करणार आहे. समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगर नियोजन पाणीपुरवठा वाहतूक सेल व मिळकत विभागप्रमुखांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT