Health workers treating a woman who has given birth at the entrance of Chandori Primary Health Centre. esakal
नाशिक

Nashik News: आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती! कर्मचारी वेळेत न आल्याने नातेवाइकांकडून संताप

सागर आहेर

Nashik News : आज (ता. १४) सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळीच कक्षात न नेण्यात आल्याने तिने आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.

रविवारची सुटी आणि कमी कर्मचारी असल्याने हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. (Delivery at entrance of health center Resentment from relatives due to non arrival of employees on time at chandori Nashik News)

निफाड तालुक्यातील आणि राज्य मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक त्रुटी यानिमित्ताने पुढे आल्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या घटनेनंतर तरी त्यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अधिक माहिती अशी ः चितेगाव (ता. निफाड) येथील उस्मान मोतीराम सय्यद यांच्या पत्नी शबाना उस्मान सय्यद प्रसूतीसाठी चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी प्रवेशद्वारी आल्या.

त्यांना प्रसूतीकळा असह्य झाल्याने त्या खाली बसल्या. त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईक व काही नागरिकांनी जोरजोरात आवाज दिला. मात्र तब्बल पंधरा मिनिटे वाट बघूनही कुणीही कर्मचारी खाली न आल्याने गोकुळ टर्ले, राजेंद्र टर्ले, नीलेश नाठे धावतच वरच्या मजल्यावर आले.

तेथे असलेले डॉ. आशिष गायकवाड व परिचारिकांनाही माहिती देत खाली बोलावले. तोपर्यंत प्रसूतीकळा असह्य झालेल्या महिलेने तेथेच बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिला कक्षात नेत तेथे उपचार करण्यात आले. मात्र हा सारा प्रकार व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टाकणारा आहे. येथील आरोग्य केंद्रात

मंजूर पदे २९ असताना केवळ १७ पदे भरली आहेत. त्यातच आज रविवार असल्याने बहुतांश कर्मचारी सुटीवर होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आरोग्य केंद्रात पाण्याची वाणवा

गेल्या आठवड्यात १४ शस्रक्रिया व एका प्रसूतीसाठी महिला दाखल असताना तब्बल सहा दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. रुग्णाच्या नातेवाइकांना घरून पाणी आणावे लागत होते, अशी माहितीही एका रुग्णाने दिली.

रिक्त जागा भराव्यात : वनारसे

माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे सांगून शासनाने लवकरात लवकर पदभरती करावी, अशी मागणी केली.

सद्यःस्थितीत या आरोग्य केंद्रात १५ गावे असून, सहा उपकेंद्रे आहेत. कित्येक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता असून, अनेकदा पाठपुरावा करूनही रिक्त कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT