कसबे सुकेणे (नाशिक) : दोन वर्षांपासून कसबे सुकेणे व परिसराकडे महामंडळाच्या बसने पाठ फिरवली आहे. कोरोना आटोक्यात येऊन सहा महिने उलटूनही कसबे सुकेणेकडे येणारी कोणत्याही आगराची बससेवा सुरू झालेली नाही.
कोरोनापूर्वी पिंपळगाव, लासलगाव, येवला, नाशिक, सिन्नर आगाराच्या बस कसबे सुकेणेकडे धावत होत्या. कसबे सुकेणे निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, आसपास दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, बाणगंगा नगर, भाऊसाहेब नगर, पिंपळस, कारसुळ, शिरसगाव आदी १० ते १२ गावे असून, कसबे सुकेणे ही एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र बस बंद असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे हाल होतात.
महामंडळाने प्रमुख पाचही आगरमधून त्वरित बससेवा सुरू करावी, यासाठी सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच सुरेखा औसारकर व ग्रामपालिका सदस्यांनी बस आगर व आमदार दिलीप बनकर यांना निवेदन दिले. कसबे सुकेणे व परिसरात बंद असल्याने प्रवासी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बस बंद असल्याने ग्रामस्थांना नाइलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. बससेवा त्वरित सुरू करावी अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असे धनंजय भंडारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.