नाशिक : देशांतर्गत नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चाळीतील कांद्याला हा भाव मिळत आहे. उन्हाळ कांद्याचा (onion) सरासरी भाव क्विंटलला दोन हजारांपर्यंत भिडला आहे. मुंबईत २४ तासांत कांद्याचा भाव क्विंटलला एक हजार ८०० वरून दोन हजार रुपये झाला. तसेच कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतमध्ये हाच भाव २१०० रुपयांच्या पुढे पोचला आहे. लासगावमध्ये गुरुवार (ता. २३) प्रमाणे शुक्रवारी (ता. २४) भाव स्थिर राहिले, तर पिंपळगावमध्ये भावात क्विंटलला १४० रुपयांची वाढ झाली.
लासलगाव अन् पिंपळगावमध्ये दोन हजार १०० च्या पुढे
येवला आणि चांदवडमध्ये शंभर, तर सटाण्यात दीडशे, देवळ्यात पावणेदोनशे आणि उमराणेत २५ रुपयांनी भाव कमी झाले. हा अपवाद वगळता कळवण, मनमाडमध्ये भाव स्थिर राहिले. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये क्विंटलला उन्हाळ कांद्याला शुक्रवारी मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः येवला- एक हजार ८५०, कळवण- दोन हजार एक, चांदवड- १ हजार ९५०, मनमाड- २ हजार, सटाणा- १ हजार ९००, लासलगाव- २ हजार १५०, पिंपळगाव बसवंत- २ हजार १५१, देवळा- २ हजार, उमराणे- १ हजार ९७५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.