नाशिक : महाविकास आघाडी सरकारतर्फे (Mahavikas Aghadi Sarkar) विकास कामांचा धडाका सुरू असताना जिल्ह्यातील प्रस्तावित सिंहस्थ परिक्रमामार्गाच्या भूसंपादनासाठी नऊ कोटीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. खासदार हेमंत गोडसे (Hemant godse) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे मागणी केली. (Demand of Rs 9 crore for land acquisition of Simhastha Marg Nashik News)
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या चार वर्षांवर येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्यासाठीच्या वाहतुकीचे नियोजन आताच करणे गरजेचे असून त्यांच्याच एक महत्त्वाचा भाग म्हणून शहराच्या बाहेरून जाणारा रिंगरोड (सिंहस्थ परिक्रमा मार्ग) आहे. शहराच्या बाह्य भागातून जाणारा राज्यमार्ग क्र.३७ हा सिंहस्थ परिक्रमा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनासाठी तातडीने नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. दर बारा वर्षांनी शहरात कुंभमेळा भरत असतो. या कुंभमेळ्यासाठी राज्यातून वा देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक लाखोंच्या संख्येने शहरात येत असतात. शहराच्या अंतर्गत असलेले रस्ते अरुंद असल्याने आजमितीस शहरात सर्वत्र वाहतुकीची मोठी कोंडी होते.
सिंहस्थातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहराच्या बाह्य भागातील राज्यमार्ग क्र.३७ वर सिंहस्थ परिक्रमा मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रस्तावित सिंहस्थ परिक्रमा मार्गालगतचा परिसरात अंजनेरी, त्रंबकेश्वर, रामशेज मंदिर, रेणुका देवी, वणी, टाकेद आदी धार्मिक स्थळे आहेत. सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या भाविकांना सिंहस्थ परिक्रमा करताना वाहतूक कोंडीची झळ बसू नये, यासाठी सिंहस्थ परिक्रमा मार्ग तयार करण्याचे काम आत्तापासूनच सुरू करणे गरजेचे असल्याने खासदार गोडसे यांनी प्रयत्न केले.
१७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार
सिन्नर, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी या तीन तालुक्यांमधून जात असून हा मार्ग राज्यमार्ग क्र. ३७ वरून जात आहे. जानोरी फाटा, सय्यदपिंप्री, लाखलगाव, जाखोरी, शिंदे, चिंचोली, विंचूर दळवी, साकूर फाटा, वाडीवऱ्र्हे, खंबाळे, महिरवणी, दुगाव, गिरणारे, रामशेज, आंबे- दिंडोरी या शिवारातून सिंहस्थ परिक्रमा मार्ग प्रस्तावित आहे. या परिक्रमा मार्गाची एकूण लांबी १३५ किलोमीटर असणार असून या पोटी १७५ हेक्टर भूसंपादनाची गरज पडणार आहे. भूसंपादनासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.
"सिंहस्थ परिक्रमा मार्गासाठी नऊ कोटीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. शहरवासीय आणि सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी मागणी योग्य असल्याने सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सांगितले." - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.