Murmura Business : दोन दशकांपूर्वी भातावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग व त्यावर आधारित व्यवसायांनी एकेकाळी घोटी शहर गजबजलेले असायचे. देशातील अनेक राज्यांतील बाजारपेठेत चवदार मुरमुरऱ्याला मोठी मागणी व पसंती असायची.
सायंकाळी भोंग्याच्या आवाजावर रात्रीतून पहाटपर्यंत कौलारू भट्ट्यांतून निघणारा धूर, हजारो कामगारांची वर्दळ, रस्तोरस्ती दिसणाऱ्या अंतर्गत वाहतुकीसाठी बैलगाड्या, माणसांची वाहतूक करणारे हातगाडे आणि मुख्य भंडारदरा चौकातून पहाटे विविध राज्यांत वाहतूक करणारे ट्रकांची वर्दळ दिसायची. (demand reduced due to markets travel gardens closed in wake of Corona ghoti murmura business nashik)
कधीही घोटीत चोरी होत नव्हती. सर्व ठिकाणी कामगारांची वर्दळ असायची. घटलेले भाताचे उत्पादन व यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे.
देशभरातून मोठ्या प्रमाणात देवस्थान व त्याची मजा चाखणारे चवदार मुरमुरऱ्यास मागणी होती. मुरमुरा भट्ट्यांची जागा यंत्रांनी घेतल्याने अनेक वर्षांपासून मुरमुरा काढण्याची हातोटी असलेल्या शेकडो कारागीर व हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली अन् तेथूनच या व्यवसायास घरघर लागली.
८०० हून अधिक मुरमुरा भट्ट्या व त्यावर आधारित कामगार, हमाल, कारागीरांना मिळणारा रोजगार नाहीसा झाला. सध्यास्थितीत १५ मुरमुरा भट्ट्या यांत्रिकीकरणाशी आजही स्पर्धा करत पारंपरिक व्यावसाय कसाबसा टिकवून आहेत.
आधी मुरमुरे मशीनरीनंतर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या बाजारपेठा, यात्रा, गार्डन यामुळे मागणी कमी झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मुरमुऱ्याचे बाजारभाव
-एक पोते ४८० रुपये (३२ पायली)
-मशिनरी मुरमुरा ३८० रुपये (२७ ते २८ पायली)
"पारंपरिक भट्टीवरील मुरमुरा खाण्यासाठी चवदार. त्याची बरोबरी यांत्रिकीकरणातून तयार केलेल्या मालाला नाही. देशभरात घोटीतील मुरमुऱ्याचे एकेकाळी नाव होते. जमिनी भूसंपादन झाल्याने भाताचे उत्पादन कमी झाल्याने, कच्चा माल मिळत नाही. पूर्वी तांदूळ राईस मिल संख्या कमी होती. आज त्यावर प्रक्रिया करणारी संख्या वाढली. भाताचे वाढलेले दर, मजुरीमुळे व्यावसायिक हताश झाले आहेत."- अरुण बेदमुथा, मुरमुरा व्यापारी घोटी.
मुरमुरा बनविण्याची पद्धत
मुरमुरा बनविण्यासाठी प्रथम भात पाण्याच्या हौदात भिजत घालत. नंतर ते सुखवले जात. पुन्हा उकळत्या पाण्यात टाकून पुन्हा सुखवले जाऊन गिरणीतून त्यावरील आवरण काढले जाते.
त्याला मिठाचे पाणी लावून भट्टीवरील कारागीरांकडे दिले जाते. कारागीर गरम कढईत समुद्राच्या रेतीवर टाकताच फुललेला चवदार मुरमुरा तयार होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.