Anganwadi worker esakal
नाशिक

Nashik News: ICDSच्या अंगणवाड्या हद्दपार करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खासगी, महापालिका व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी अंगणवाड्यांमधील विद्यार्थी पळविले जात आहेत. यासंदर्भात कामगार हितरक्षक सभेने आयसीडीएसच्या अंगणवाड्या हद्दपार करण्याची मागणी केली आहे. (Demand to evict ICDS Anganwadis Nashik News)

त्र्यंबक रोडवरील कविवर्य नारायण टिळक वाचनालय येथे कामगार हितरक्षक सभेचे अध्यक्ष किरण मोहिते यांच्याप्रमुख उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. महापालिकेने १९९३ पासून ४१९ अंगणवाड्या सुरू केल्या.

एकात्मिक महिला व बालविकास विभागातर्फेही शहरात जवळपास दोनशे अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. एकाच शहरात दोन शासकीय यंत्रणा सारखाच प्रकल्प राबवित असल्याने विद्यार्थी पटसंख्या मिळविण्यासाठी महापालिका अंगणवाडी व आयसीडीएसच्या अंगणवाड्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे आयुक्तांनी आयसीडीएसच्या अंगणवाड्या महापालिका क्षेत्रातून हद्दपार कराव्या, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, २०१८ मध्ये बंद करण्यात आलेल्या १२२ अंगणवाड्या पूर्ववत कराव्या,

कोरोनाकाळात निलंबित करण्यात आलेल्या २० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करावे, कोरोनाकाळात बळी गेलेल्या दिवंगत योगिता बोरसे व कुंदा दळवी यांना शासन निर्णयानुसार ५० लाखांची नुकसानभरपाई मिळावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या जाणार आहेत.

बैठकीत कोरोनायोद्धा दिवंगत योगिता बोरसे व कुंदा दळवी यांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी चैताली भालेराव, कृष्णा शिंदे, जतीन खतीब, सुशीला साळवे, सविता लोखंडे, शोभा सोनार, सुनंदा धनगर, सुनीता भोईर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT