YIN Election 2023 esakal
नाशिक

YIN Election 2023 : लोकशाहीच्‍या मेळ्याचा तरुणाईकडून जल्‍लोष; ‘यिन’च्‍या निवडणुकीला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाविद्यालयातून नेतृत्‍व घडविताना मतदानाचा जागर सोमवारी (ता. ९) शहरासह ग्रामीण भागात करण्यात आला. ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित ‘यिन’ नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘यिन’ निवडणुकीला महाविद्यालयांमध्ये उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकशाहीच्‍या या मेळ्यात सहभागी होऊन तरुणाईकडून जल्‍लोष करण्यात आला.

उमेदवारांमधून महाविद्यालयीन अध्यक्षपदासह कार्यकारिणी पदांसाठी निवड करण्यात आली. आता शहरातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची ओढ लागली आहे. (Democracy fair cheered by youth Response of YIN Election 2023 nashik news)

विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी उत्‍साह

उमेदवारांसह मतदार विद्यार्थ्यांमध्ये प्रक्रियेविषयी उत्‍साह बघायला मिळाला. मतदानाला सामोरे जाण्यापूर्वी उमेदवारांनी आपापले धोरण, दृष्टिकोन मतदार विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला होता. नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

लोकशाहीच्‍या या मेळ्यात सहभागी होताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या माध्यमातून महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशा कार्यकारिणी पदांसाठी विद्यार्थ्यांमधून निवड करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात आली.

निवडणुकीची क्षणचित्रे..

* मतदानासाठी विद्यार्थ्यांच्‍या लागल्‍या रांगा
* कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करत मतदान
* विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींमध्ये मतदानाविषयी उत्‍साह
* उमेदवारांनी जोपासली सामाजिक, बंधुत्‍वाची भावना
* खेळीमेळीच्‍या वातावरणात संपूर्ण प्रक्रिया पडली पार
* विजेत्‍यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव, माळ घालत केला जल्‍लोष

विद्यार्थिनींमध्ये मतदानाविषयी उत्‍साह

‘के. के. वाघ’मध्ये मेहूलची निवड

पंचवटीतील के. के. वाघ औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयात झालेल्‍या निवडणुकीत मेहूल अमेसर याने बाजी मारली. १७१ मत मिळविताना त्‍याने महाविद्यालयीन अध्यक्षपदाचा बहुमान पटकावला. उपाध्यक्षपदी सिद्धार्थ काळे (९५ मते), तर सचिवपदी दिनेश पवार (४३), सहसचिवपदी मयंक चव्‍हाण (२४) यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रा. डॉ. अजय सुराणा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून काम पाहिले.

सपकाळ अभियांत्रिकीत यश पवार अध्यक्षपदी

कल्‍याणी चॅरिटेबल ट्रस्‍ट संस्‍थेच्‍या लेट. जी. एन. सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयात यश पवार याने अध्यक्षपदी बाजी मारली. त्याने ३०४ मते मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. महाविद्यालय उपाध्यक्षपदी हृषीकेश परदेशी (१०६ मते), सचिवपदी गौरव शिरोडे (८४), तर सहसचिवपदी महेश तांबडे (३२) यांची निवड झाली. महाविद्यालयातून निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून प्रा. किरण देवरे यांनी काम पाहिले.

सपकाळ फार्मसीतून दर्शनकडे अध्यक्षपदाची धुरा

कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे अंजनेरी येथील आर. जी. सपकाळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथून दर्शन देवरे याच्‍याकडे अध्यक्षपदाची धुरा असणार आहे. दर्शनने १५९ मते मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उपाध्यक्षपदी रोहित माळी (११३ मते), सचिवपदी निशांत गिते (३२), सहसचिवपदी व्‍यंकटेश कुंदे यांची निवड झाली. महाविद्यालयातून प्रा. तृप्ती कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून काम पाहिले.

इन्‍स्‍टिट्यूट ऑफ फार्मसीत आदित्‍यला बहुमान

अंजनेरी येथील कल्‍याणी चॅरिटेबल ट्रस्‍ट संचालित आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये आदित्‍य झोपे याला महाविद्यायीन अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. त्‍याने ७३ मते मिळविली. तर अंकित त्रिभुवन (६३) याची महाविद्यालयीन उपाध्यक्षपदी निवड झाली. सचिवपदी पंकज पवार, तर सहसचिवपदी केतन घोरपडेची निवड झाली. महाविद्यालयातून निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून प्रा. डॉ. दीप्ती फरताडे यांनी काम पाहिले.

‘बीवायके’मध्ये प्रांजल महाविद्यालयीन अध्यक्षपदी

गोखले एज्‍युकेशन सोसायटी संस्‍थेच्‍या कॉलेज रोडवरील बीवायके वाणिज्‍य महाविद्यालयातून प्रांजल दिवाकर हिने ६६ मते मिळवून अव्वल क्रमांक पटकावत महाविद्यालयीन अध्यक्षपदी बाजी मारली. हर्षदा कवर (३४) महाविद्यालयीन उपाध्यक्ष, तर अंकिता आहिरे हिने सचिव, तर भूपेश कवर याची सहसचिवपदी नियुक्‍ती झाली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

‘पीव्‍हीजी’मध्ये दिनेशच्‍या गळ्यात विजेतेपदाची माळ

पुणे विद्यार्थिगृह संस्‍थेच्‍या म्‍हसरूळ येथील पीव्‍हीजी शिक्षणशास्‍त्र व संशोधन महाविद्यालयातून दिनेश बच्‍छाव याने ५० मते मिळवून अव्वल स्‍थान राखले. यासोबत महाविद्यालयीन अध्यक्षपदासाठी विजेतेपदाची माळ त्‍याच्‍या गळ्यात पडली आहे. महाविद्यालयीन उपाध्यक्षपदी संदेश कांडेकर (२०), सचिवपदी रोशन पाटील (१३), सहसचिपदी समाधान मोरे याची नियुक्‍ती झाली.

पुढील टप्प्‍यातील निवडणुका अशा-

‘यिन’ महाविद्यालनीय निवडणूक प्रक्रियेअंतर्गत पुढील टप्प्‍यातील निवडणुका येत्‍या १२, १६ व १९ जानेवारीला होणार आहेत. इच्‍छुक महाविद्यालयांनी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ‘यिन’चे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे (९०७५०१७५०८) यांच्‍याशी संपर्क साधावा. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘यिन’च्‍या अधिकृत ॲपवर सुरू असल्‍याचे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT