Dengue esakal
नाशिक

Nashik Dengue Update : शहरात डेंगीचाही वाढता विळखा...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Update : डोळे व तापाची साथ सुरू असताना दुसरीकडे डेंगीच्या रुग्णांमध्येदेखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महापालिकेकडे झालेल्या नोंदणीनुसार २१६ पैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मलेरिया विभागाने गुरुवारी (ता. २७) केलेल्या तपासणीनुसार शासकीय कार्यालयांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलिस हेडकॉटर व एमएसईबी येथे डास उत्पत्तीची स्थळे आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. (Dengue increasing in city Nashik)

खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले असून, प्लेटलेट्स कमी झाल्याने रक्तपेढ्यांमध्येदेखील रक्ताची मागणी वाढली आहे. महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जुलै महिन्यात २१६ रुग्ण आढळून आले.

त्यातील २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सुदैवाने एकही मृत्यू डेंगीमुळे झालेला नाही. जानेवारी महिन्यात १२५ संशयित आढळले होते, तर १७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फेब्रुवारी महिन्यात १२२ संशयित आढळले होते.

त्यापैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह आले. मार्च महिन्यात ९८ अहवाल तपासण्यात आले, त्यापैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह आले. एप्रिल महिन्यात ५२ पैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर मे महिन्यात ७१ पैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले.

जून महिन्यात ११६ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आले. २७ जुलैपर्यंत २१६ पैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले. जानेवारी ते आत्तापर्यंत ८०० संशयितांच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या.

त्यापैकी १४३ डेंगी रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. सदर आकडेवारी ही फक्त नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमधील आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खासगी रुग्णालयांमध्ये यापेक्षा कितीतरी पटीने रुग्ण संख्या आढळून येत आहे. मागील वर्षी २८७१ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ६७७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

पोलिस, वीज कंपनीला नोटीस

डेंगी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया विभागाचे डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी पश्चिम व सिडको विभागात पाहणी केली.

पोलिस हेडकॉटर व सिडको एमएसईबी कार्यालयामध्ये डास उत्पत्तीची स्थळे आढळून आल्याने या दोन्ही कार्यालयांना नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे त्र्यंबके यांनी माहिती दिली.

त्याचबरोबर येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण सरकारी कार्यालयांचा अहवाल प्राप्त होणार असून या कार्यालयांमध्ये डास उत्पत्तीची स्थळे आढळतील त्या कार्यालयांना नोटीस बजावली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT