market committee election  esakal
नाशिक

Market Committee Election Result: देवळा बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता!

सकाळ वृत्तसेवा

Deola Market Committee Election Result : बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. लोकमान्य शेतकरी पॅनलने तीन जागा लढविल्या.

हमाल तोलारी गटात दोन्ही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी करत एकमेकांविरुद्ध लढत दिली. शुक्रवार (ता.२८) रोजी या बाजार समितीच्या मतदानात १०४३ पैकी १०१७ मतदारांनी मतदान केल्याने ९७.५० टक्के मतदान झाले.

मतदानानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनेलच्या बाजूने निकाल लागल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. १८ पैकी आठ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या. (deola Market Committee Election Result shetkari vikas Panels rule nashik news)

भाजप व महाविकास आघाडी यांनी शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करून सोसायटी गटात सात व व्यापारी गटात दोन असे नऊ उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर याच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तीन उमेदवारांनी एकत्रित येत लोकमान्य शेतकरी पॅनल उभे केले होते.

आणि इतर तीन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी केली असली तरी शेतकरी विकास पॅनलला त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. मतदान प्रक्रियेत सोसायटी गटातील ५१० पैकी ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर व्यापारी मतदारसंघात ४३७ पैकी ४२३ व हमाल व्यापारी मध्ये ९६ पैकी ९४ मतदारांनी मतदान केले.

दिवसभर झालेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळी सकाळपासून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ ठाण मांडून होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी येथील मतदान केंद्र यांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

तर सहाय्यक निबंधक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बिनविरोध उमेदवार

धनश्री आहेर, विशाखा पवार, दिलीप लालजी पाटील, दीपक बच्छाव यांचा समावेश असून ग्रामपंचायत मतदारसंघात रेश्मा महाजन, शाहू शिरसाठ, भास्कर माळी, शीतल गुंजाळ यांची समावेश आहे.

विजयी उमेदवार व मते

शिवाजी आहिरे (३२१), योगेश आहेर (४०५) अभिजित निकम (२८७), भाऊसाहेब पगार (३७३), अभिमन पवार (३५८), शिवाजीराव पवार (३३६), विजय सोनवणे (३६२)

व्यापारी गट :

निंबा धामणे (३२९), संजय शिंदे (३६५), हमाल मापारी गटात भाऊराव नवले ५७ मते मिळवत विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT