Panditrao Nikam, Satish Somvanshi and others along with Kuber Jadhav while filing nomination form from society group for market committee election. esakal
नाशिक

Deola Market Committee Election : निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची? 51 उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि. नाशिक) : बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार (ता.३१) रोजी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आजअखेर उमेदवारी अर्जांची संख्या एकूण ५१ झाली आहे. शेतकरीवर्ग उमेदवारी करू शकणार असल्याने बाजार समिती निवडणुकीस रंग भरू लागला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने सोमवार (ता.३) रोजी मोठ्या संख्येने आणखी उमेदवारी अर्ज दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे देवळा बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध होणार की चुरशीची याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Deola Market Committee Election Will election be uncontested or tight 51 nominations filed nashik news)

देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण अठरा जागांसाठी सोमवार (ता.२७) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरवात झाली आहे. बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर , माजी उपसभापती दिलीप पाटील, माजी संचालक सुनील देवरे , संजय शिंदे, जगदीश पवार, माजी सरपंच दीपक बच्छाव, सरपंच स्वप्नील अहिरे, कैलास देवरे, माजी सरपंच व अध्यक्ष शिवाजी अहिरे, खर्डे विकास सोसायटीच्या अध्यक्ष दीपाली जाधव, तसेच उपसरपंच सुनील जाधव, विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव आदी मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवार ३ एप्रिल रोजी अंतिम मुदत असून या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशासक व सहायक निबंधक सुजय पोटे कामकाज बघत आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नेत्यांकडे उमेदवारांची फिल्डींग

दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावांत इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याची लगभग पहावयास मिळत आहे. यानिमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. मात्र खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल.

गट निहाय दाखल अर्ज

सोसायटी गट -३१, ग्रामपंचायत गट - ११, व्यापारी गट - ६, हमाल व तोलारी गट -३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT