नाशिक रोड : उपनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे असलेल्या भारती साहेबराव आहिरे (वय ४५, रा. नाशिकरोड) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
भारती अहिरे यांनी उपनगर भागात सर्वसामान्य नागरिकांची साथीदारांसह फसवणूक करणे, साथीदाराचे मदतीने क्रुरपणे वागणूक देवून मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करणे, अनधिकृतपणे घरात प्रवेश करून विनयभंग करणे, अब्रु नुकसानीची धमकी देवून खंडणी मागणे, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागणे, मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. (Deportation action against Bharti Ahire total of 61 Tadipar during year in circle two Nashik Crime)
महिलेने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळित केल्याने तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केलेली आहे.
६१ सराईत तडीपार
आत्तापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ६१ लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आले म्हणून २० गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.