Nashik Anjaneri News : हनुमानाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनेरी पर्वताजवळ आता विद्यार्थ्यांना ॲडव्हेंचर (गिर्यारोहक) प्रशिक्षण देण्यासाठी पर्यटन विभाग व भोसला मिलिटरी स्कूलने इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या सहा महिन्यांत येथे नागरिकांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. (Dept of Tourism and Bhonsala Military School decided to start institute to provide adventure training to students nashik news)
नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासह गड-किल्ले, कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात प्रसंती मिळते. धार्मिक स्थळांमध्ये पंचवटीसह त्र्यंबकेश्वर, वणी येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक नाशिकमध्ये येतात. त्याबरोबरच अंजनेरी येथे गिर्यारोहकांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
त्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलने पुढाकार घेतला असून, क्रीडा विभागाच्या इमारतीत हे प्रशिक्षण दिले जाईल. एका बॅचमध्ये ३० ते ४० व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. गिर्यारोहकांना आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण या ठिकाणी कसे मिळेल, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन वाढीसाठी याचा कसा उपयोग होऊ शकेल, यादृष्टीने पर्यटन विभाग प्रयत्नशील राहणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रशिक्षणाचा कालावधी, त्यासाठी लागणारे साहित्य आणि बॅचमधील सहभागी व्यक्तींची संख्या ठरविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येत्या नवीन वर्षात विद्यार्थ्यांसह गिर्यारोहकांना येथे प्रशिक्षण मिळेल.
या गोष्टीही शिकायला मिळतील
गिर्यारोहकांसाठी फक्त डोंगरावर जाणेच महत्त्वाचे नाही, तर जंगल सफारीही समजून घेणे महत्त्वाचे असते. जंगलात जाताना काय काळजी घेणे आवश्यक आहे. पॅराग्लाईडिंगसारखे अवघड प्रशिक्षणही या ठिकाणी शिकायला मिळेल. त्यामुळे नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होत आहे.
"भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आम्ही पर्यटनाला चालना देत आहोत." - मधुमती सरदेसाई, उपसंचालक, पर्यटन संचलनालय, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.