Ajit Pawar Sakal
नाशिक

चंद्रकांतदादा वैफल्यग्रस्त, त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप - अजित पवार

विनोद बेदरकर

नाशिक : माजी मंत्री चंद्रकांतदादा हे सत्ता नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काहीही आरोप करीत आहे. चंद्रकांतदादा कोल्हापूरचे पालकमंत्री असतांना शिवसेनेच्या तेथील आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. (Deputy Chief Minister Ajit Pawar said that Chandrakant Patil is also accused of corruption)



पवार आज नाशिक दौऱ्यावर होते, त्या दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ आदीसह स्थानीक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत असतांना, चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवार यांच्यावर पोलीस आधिकाऱ्यांनी आरोप केल्याने त्यांच्यावरील आरोपाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीची मागणी केली होती. त्याविषयी विचारले असता ते बोलत होते.

पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील ज्या पोलिसाविषयी बोलत आहेत. ते आरोपी म्हणून तुरुंगात आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अशा आरोपी असलेल्यावर विश्वास ठेवायचा का ? आरोपावर विश्वास ठेवायचा तर, मग चंद्रकांत दादा सहकार आणि महसूल मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या तेथील आमदार राजेश क्षीरसागर यांनी भष्ट्राचाराचे आरोप केले होते. क्षीरसागर हे आमदार होते. तीन लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार असतांना आरोप केले आहेत. आरोप कोण करतात हे महत्वाचे आहे. एखादा आरोपी तक्रार करेन तुरुंगात राहून कुणाचेही नाव घेईन त्याला लक्ष्य करायचे का? याचा विचार केला पाहीजे. पण सत्ता गेल्यामुळे चंद्रकांतदादा हे वैफल्यग्रस्त झाले आहेत.


जनगणनेचे आकडे द्यायला काय हरकत?

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी फेटाळतांना ते म्हणाले की, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने स्थानीक स्वराज्य संस्थातील ५६ हजार जागा कमी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी केंद्र शासनाने जणगनना केल्याची आकडेवारी गरजेची आहे. पालकमंत्री छगन भुजबळांच्या साक्षीने सांगतो की, आमची तयारी आहे.पण केंद्र शासनाने जनगणनेची आकडेवारी द्यायला काय हरकत आहे. सत्तेत असलेल्यांना महाविकास आघाडी सरकारला सर्व समाज घटकांना सोबत घेउन हे सरकार काम करत हा विश्वास द्यायचा आहे. त्यादृष्ट्रीने सरकार काम करत आहे. मात्र विरोधकांना लोकांमध्ये हा विषय निर्माण होउ द्यायचा नाही. त्यामुळेच ते आरोप करीत आहे.

पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय तसाच आहे. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करणारे आहोत. आमच्या वरिष्ठांची साठ वर्षाची वाटचाल बघीतली तरी, हे लक्षात येईल मात्र हा विषय उच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे. तसेच यात दिव्यांगाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे.त्यामुळे न्यायप्रविष्ठ प्रकरणात सरकारला निर्णय घेता येत नाही.



तुम्हाला नाही का संपादक व्हावस वाटेल

पदोन्नतीची प्रत्येकाला अपेक्षा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाहून मुख्यमंत्री पदी पदोन्नती कधी? याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, आमच्या महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी पाच वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांची निवड केली आहे. आम्ही सगळे आघाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. पदोन्नतीचा विषय कुणाला आवडत नाही. तुम्हाला संपादक म्हणून पदोन्नती आवडणार नाही का, तसंच आहे. पण आघाडी म्हणून आम्ही पाच वर्षासाठी ठाकरे यांनाच स्विकारले आहे.



अजित पवार म्हणाले
- वारीचा अभिमान, पण कोरोनामुळे प्रतिबंध
- लोकांच्या आरोग्यामुळे मंदीर,वारी बाब त निर्बंध
- मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना ५ वर्षासाठी निवडले
- केंद्राच्या आर्थिक अडचणीमुळे स्मार्ट सिटी रखडल्या

(Deputy Chief Minister Ajit Pawar said that Chandrakant Patil is also accused of corruption)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT