Ramesh Kale speaking in the training of District Nodal Officers. Neighbor Officer esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक तयारीसाठी फेब्रुवारी महत्त्वाचा : उपायुक्त रमेश काळे

लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने फेब्रुवारी अंत्यत महत्त्वाचा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने फेब्रुवारी अंत्यत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने निवडणुकीच्या अधिसूचना, मार्गदर्शक सूचना, कायदे व नियम यांचे वाचन करून आवश्यक नोंदी आत्ताच काढून ठेवण्याची सूचना विभागीय उपायुक्त रमेश काळे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात गुरुवारी (ता.१८) जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण पार पडले. (Deputy Commissioner Ramesh Kale statement of February is important for Lok Sabha election preparations nashik news )

यावेळी श्री. काळे म्हणाले, की नोडल अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचा वापर केल्यास आवश्यक नियम, सूचनांविषयी माहिती मिळेल. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन अपलोड करताना सर्व बाबी व आवश्यक पूर्तता अचूक पाहूनच अपलोड करावे.

नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे, माहिती अद्ययावत करणे ही कामे प्रशासकीय पातळीवर केली जात आहेत. संकलित झालेली माहिती अचूक हवी. यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर (शिर्डी), निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, शर्मिला भोसले, रवींद्र भारदे, शाहूराज मोरे, अतुल चोरमारे (नगर), उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, बबन काकडे (बागलाण), अप्पासाहेब शिंदे (दिंडोरी), महेश सुधाळकर (जळगाव), नितीन सदगीर (मालेगाव), तहसीलदार मंजूषा घाटगे (निवडणूक शाखा), नायब तहसीलदार राजेश अहिरे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT