Nashik News : बेकायदेशीररीत्या शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली होती.
यासंदर्भात शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. शुक्रवार (ता. ११)पासून संबंधित २० महाविद्यालयांच्या चौकशीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. (Deputy Director forms committee to investigate illegal fees charging colleges Nashik News)
शुक्रवारी निफाड तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयाची चौकशी करण्यात आली. या वेळी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे तक्रारी मांडण्यात आल्या. अनुदानित जागांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या तुलनेत कमी रकमेची पावती दिली जाते.
विनाअनुदानित तुकडीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांबाबत पावत्यांचा घोळ असल्याचा दावा या वेळी करण्यात आला.
जेईई, सीईटी, नीट परीक्षांच्या तयारीसाठी अतिरिक्त शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग आणि खासगी क्लास करण्याची परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वर्गखोलीची व्यवस्था केल्याचाही आरोप करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सहाय्यक शिक्षण उपसंचालक तसेच चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले एल. डी. सोनवणे व सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक डी. टी. देवरे यांच्यासमोर हे मुद्दे मांडण्यात आले.
महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागूल यांनी केली आहे. या वेळी छात्रभारतीचे जिल्हा कार्यवाह स्वरूप पिसे, सचिव रोहित वाघ, उपाध्यक्ष श्रेयस डेंगळे, संघटक स्पर्श शिराळ, सत्यम लहांगे, अजिंक्य निकाळे, तेजस सूर्यवंशी उपस्थित होते.सहाय्यक शिक्षण उपसंचालक तसेच चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले एल. डी. सोनवणे व सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक डी. टी. देवरे यांच्यासमोर हे मुद्दे मांडण्यात आले.
महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागूल यांनी केली आहे. या वेळी छात्रभारतीचे जिल्हा कार्यवाह स्वरूप पिसे, सचिव रोहित वाघ, उपाध्यक्ष श्रेयस डेंगळे, संघटक स्पर्श शिराळ, सत्यम लहांगे, अजिंक्य निकाळे, तेजस सूर्यवंशी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.