Bribe case  esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयातील उपधीक्षक महिला ACBच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : तक्रारदराने खरेदी केलेल्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला उपअधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. (Deputy Superintendent of Land Records Office arrested at Sinnar by ACB Nashik Bribe Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्राप्त माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराने मनेगाव (ता. सिन्नर) येथे खरेदी केलेल्या प्लॉटचे सिटी सर्व्हे नंबर रेकॉर्डवर जुन्या मालकाचे नाव होते. त्यामध्ये बदल करून तक्रारदाराला स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे होते.

यासंदर्भात, सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक उपअधीक्षक प्रतिभा दत्तात्रय करंजे यांनी सदर कामासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशा आशयाची तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येवून करंजे यांना भूमी अभिलेख कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक,श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विश्वजीत जाधव पोलीस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

सहायक सापळा अधिकारी :- श्री परशुराम कांबळे , पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक ,सापळा पथक- पो. हवा .श्री प्रकाश डोंगरे, पो हवा .श्री संतोष गांगुर्डे, पो. हवा .श्री प्रणय इंगळे, म पो. कॉन्स्टेबल श्रीमती शितल सूर्यवंशी , यांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

Viral: माझा पती दरवर्षी नवीन मुलीसोबत लग्न करतो, ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीनं फोडलं बिंग

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT