Nashik News : शहरातून पंचवटीत जाण्यासाठी व पंचवटीतून शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तत्कालीन नगर पालिकेच्या काळात रामसेतूची निर्मिती झाली.
आजवर शेकडो छोट्या- मोठ्या पुरांसह तब्बल चार महापूर अनुभवलेल्या पुलाची दुरवस्था होऊनही नवीन पूल सोडाच डागडुजीही थांबल्याने आता या पुलाचे भवितव्य रामभरोसेच असल्याचे दिसून येते. (Despite dilapidation of bridge experienced four floods future of ramsetu bridge repair stopped at godaghat nashik)
१९५४ च्या आसपास रसिकभाई पारिख यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालेल्या व सर्वाधिक पूर, महापूर अनुभवलेल्या रामसेतूची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. मध्यभागी मोठे खड्डे पडले असून, पुलाच्या स्लॅबचा बराचसा भागही वारंवारच्या पुरात वाहून गेला आहे. \
व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे पुलाला गचाळ स्वरूप प्राप्त झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पुलाला समांतर पूल उभारून रुंदीकरण करण्यात आले, परंतु आता या जुना व नवा अशा दोन्ही पुलांच्या मधोमध चिरा पडू लागल्या आहेत.
शहराच्या विविध भागात त्यात गोदाघाटावरील कोट्यवधीची कामे स्मार्टसिटीतंर्गत प्रस्ताविक होती. त्यात गोदाघाटाच्या सौंदर्यीकरणासह जीर्ण झालेल्या रामसेतूच्या जागी नवीन पुलाचे नियोजन करण्यात आले होते.
अर्धगोलाकार असलेल्या या पुलाच्या नवीन डिझाईनचेही त्यावेळी मोठे कौतुक झाले होते, कालांतराने नवीन पुलाऐवजी पुलाचे स्कट्रक्चरल ऑडिट करण्याचे निश्चित करण्यात आले.
यासाठी संबंधित यंत्रणेने नवीन पुलाची गरज फेटाळून अस्तित्वात असलेल्या पुलाची डागडुजी करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु स्मार्टसिटीकडून गोदाघाटावर सुरू असलेली अन्य कामेही सध्या थांबलेली असताना पुलाची दुरुस्तीही बारगळली आहे.
अनेक खांब उद्ध्वस्त
स्मार्टसिटीकडून गोदाघाटाच्या दुतर्फा फरशा टाकण्यात आल्या. याशिवाय नदीच्या दुतर्फा नक्षीदार स्तंभ उभारण्यात आले. त्यामुळे गोदावरीचे सौंदर्य अधिक खुलले होते, परंतु या स्मार्ट कामांची गोदाघाटावरील भुरटे चोरटे, गर्दुल्यांकडून तोडफोड सुरू आहे.
नदीकाठावर लावण्यात आलेले व सुशोभित केलेले अनेक खांब समाजकंटकांनी उद्ध्वस्त केले आहेत. एवढेच नव्हे तर परिसरातील पुलांचे कठडेही या भुरट्या चोरांकडून ‘लक्ष्य’ होत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.