Water Shortage : यंदा मार्च महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आणि कमाल पाराही ३५ अंशापलिकडे पोहोचला. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असून, सर्वाधिक सात टँकर येवला तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात एकीकडे अवकाळीचा कहर दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र आहे. (despite unseasonal rain crop damage shortage of water in city nashik news)
नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी याच जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये शेकड्याने पाण्याचे टँकर धावतात हेही वास्तव आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याचा साठा होता.
मात्र, गेल्या मार्च महिन्याच्या मध्यापासूनच कमाल तापमानामध्ये कमालीची वाढ झाली. एरवी एप्रिलच्या मध्यानंतर व मे महिन्यात नाशिक जिल्ह्यातील कमाल पारा चाळिशी पार करतो. मात्र यावेळी मार्च महिन्यातच कमाल पारा ३५ अंशापलिकडे पोहोचल्याने नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली.
ग्रामीण भागात आत्ताच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे पाण्याच्या टँकरसाठी मागणी वाढू लागली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
पाण्याच्या टँकरसाठीच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. त्या संदर्भात गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील १७ गावे-वाड्यांना १३ पाण्याच्या टँकरला मंजुरी देत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक येवला तालुक्यातील ११ गाव-वाड्यांसाठी सात टँकर मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे, चांदवड, इगतपुरी आणि देवळा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
तालुके पाण्याचे टँकर
येवला ७
चांदवड ३
इगतपुरी २
देवळा १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.