नाशिक : मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केल्यानंतर नाशिकमधील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. स्वतः शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते.
त्यामुळे ब्राह्मण आणि पुजारी हा मंदिराचा अविभाज्य घटक आहे. छत्रपतींनी स्वतः अनेक मंदिरांत त्रिकाल पूजा लावून दिलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा सवाल पुजारी नरेंद्र धारणे यांनी मराठा सेवा संघाला केला आहे. (destroy what Chhatrapati started Purohit Sangha asked Purushottam Khedekar over Vedokt Controversy nashik news)
छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या विधानाला महत्त्व आहे.
आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे. ब्राह्मणांऐवजी मंदिरांत बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी, अशी मागणी खेडेकर यांनी केली आहे. त्यावर नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील पूजाऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
मराठा सेवा संघाची मागणी पूर्णतः चुकीची असून, स्वतः शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते. त्यामुळे ब्राह्मण आणि पुजारी हे मंदिरांचे अविभाज्य घटक आहेत. वैदिक काळापासून या परंपरा सुरू आहेत. छत्रपतींनी स्वतः अनेक मंदिरांत त्रिकाल पूजा लावून दिलेल्या आहेत.
त्यामुळे आता छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा आमचा मराठा सेवा संघाला सवाल असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले कि, त्यांनी जर विरोध केला, तर आम्ही लढा देऊ. शिवाय छत्रपतींनी मंदिराला ताम्रपटही लिहून दिले आहेत. वेळ पडल्यास न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारादेखील पुजाऱ्यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.