Sinnar Market Committee : सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यातील १२८ गावांसाठी ८ मतदान केंद्र, ग्रामपंचायत आणि सोसायटी गटातील मतदारांसाठी सिन्नर शहरासह ग्रामीण भागात एकुण ७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
सर्व हमाल-मापारी आणि व्यापारी गटातील मतदारांसाठी सिन्नर शहरातील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात मतदान केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. (Determination of Polling Stations for Sinnar Market Committee election nashik news)
बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२८) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. यासाठी ब. ना. सारडा विद्यालय, सिन्नर, जि. प. शाळा वावी, जि. प. शाळा शहा, जि. प. शाळा डुबेरे, जनता विद्यालय पांढुर्ली, जि. प. शाळा वडांगळी, जि. प. शाळा नांदूरशिंगोटे, हमाल मापारी गटासाठी ब. ना. सारडा विद्यालय,
सिन्नर येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक बुथवर सोसायटी गटासाठी ५, ग्रामपंचायत गटासाठी ४ अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एकुण ८० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
याच दिवशी सायंकाळी पाचपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या सिन्नर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात संकलित केल्या जाणार आहे. त्यानंतर तेथेच मतमोजणी प्रक्रिया घेतली जाणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
निवडणुकीतील गैरप्रकार व आरोप प्रत्यारोप रोखण्यासाठी बाजार समितीसह तालुक्यातील सोसायट्यांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
२८५७ मतदार ठरवणार भवितव्य
सोसायटी गटात १२७१, ग्रामपंचायत गटात १०६३, व्यापारी गटात १७१, हमाल-मापारी गटात ३५२ असे एकुण २८५७ मतदार बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या मतदारांच्या हाती बाजार समितीच्या सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.