NCP Sharad Pawar : सध्या महाराष्ट्रात चाललेल्या सत्तासंघर्षाच्या लाटेत नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या देवळाली विधानसभा आमदार सरोज अहिरे या अजित पवार यांच्याबरोबर असल्या तरी आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. (Determination support of office bearers towards NCP Sharad Pawar at Nashik Road)
कार्यकर्ते संभ्रमावस्थेत जायला नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. आम्ही पवार साहेबांचे निष्ठावान असून, महाराष्ट्राचा एकच आवाज म्हणून शरद पवार आहेत, असे या वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.
अजित पवार यांच्या पाठीशी कोण याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड येथील कार्यकर्ते सध्या एकवटले आहेत. पक्षाचे नाशिक रोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी आमचा विचार पक्का असल्याचे सांगितले आहे.
कितीही वादळे आले तरी आम्ही भूमिका आणि नेता बदलणार नाही. असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नाशिक रोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे, प्रशांत वाघ, माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी आपण एकनिष्ठ असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिक जिल्ह्याला आमदार खासदार नगरसेवक दिले असून, त्यामध्ये नाशिक रोड येथील नेते व पदाधिकाऱ्यांचा सहभाग मोठा आहे.
"आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून कितीही सत्ता संघर्षाच्या लाटा आल्या तरी भूमिका बदलणार नाही." - विक्रम कोठुळे.
"शरद पवार साहेब हा विचार आहे. आम्ही त्यांच्या विचारांवर आजपर्यंत समाजकारण केलेले आहे. पवार साहेब सांगतील तो अंतिम शब्द असेल म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबरच आहोत." - मनोहर कोरडे, विभाग अध्यक्ष, नाशिक रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.