नाशिक : स्कील इंडिया मोहिमेंतंर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये ‘क्वालिटी सिटी‘ या चळवळीची घोषणा करण्यात आली.
‘क्वालिटी सिटी’मध्ये कौशल्य विकास, स्वच्छता, शिक्षण या क्षेत्रांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. महापालिका, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात एक सामंजस्य करार केला जाणार आहे. (Determined to make Nashik Quality City Skill development cleanliness and education movement under guidance of CCI Nashik News)
महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक झाली. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष जक्षय शहा, एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितूभाई ठक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषणा करण्यात आली.
घरेलू कामगार, वाहन चालक, शिपाई, सुपरवायझर स्तरावरील कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे. एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी माहिती देताना म्हणाले, की शाश्वत विकास आणि कौशल्य आत्मसात केल्याने नाशिकचा दर्जा अधिक सुधारेल.
पहिल्या पाच शहरात नाशिक
शहरांच्या शाश्वत विकासाला गती देताना दर्जा, गुणवत्ता वाढविण्याचे ध्येय आहे. या उपक्रमात देशातील पाच शहरांची निवड करण्यात आली असून पहिला मान नाशिकला मिळाला आहे. नाशिक च्या समग्र विकासासाठी याचा फायदा निश्चित होईल असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी या वेळी व्यक्त केला.
या संस्थांचे मिळणार सहकार्य
जिल्ह्यात कौशल्य विकास, स्वच्छता, शिक्षण चळवळीचे तीन प्रमुख उदिष्ट आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी या संस्थांचे सहकार्य आहे. यात महापालिका, क्रेडाई नाशिक मेट्रो, सिटीझन्स फोरम, आयमा, निमा, असो ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनिअर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन,
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नरेडको, कॉम्प्युटर असोसिएशन, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नीता, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसीएआय, फिक्की, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, केमिस्ट असोसिएशन,
रिक्षाचालक संघटना, इस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, नाशिक फर्स्ट, मी नाशिककर, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, असोचेम, कॉर्पोरेटर्स, को- ऑप. बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, जिल्हा परिषद, आदिवासी विकास, महसूल विभाग यांचा समावेश आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
अशी राबविली जाईल चळवळ
- स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला प्रथम क्रमांकावर आणणे.
- शहराला लागून असलेल्या पाच गावांचा आदर्श गाव म्हणून विकास.
- प्रशिक्षण व प्रकल्प पुढे नेण्यासाठी संघटनांशी संपर्क.
- नाशिक सिटिझन फोरमचा पुरस्कार प्राप्त नगरसेवकांच्या माध्यमातून घरगुती कामगार जोडणे.
- महिला बचत गटांना जोडणे.
- औद्योगिक कामगारांना प्रशिक्षित करणे.
- हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास.
- कचऱ्याचे पृथक्करण, विल्हेवाट जनजागृती.
- वृक्षारोपण करणे.
- जलसाठ्याचे संवर्धन, जीर्णोद्धार.
- हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारणे.
- सरकारी शाळांमधील विद्यार्थी गळती थांबविणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.