Teachers Day : सोशल मीडिया साधनांचा दुरुपयोग करून समाज विघातक प्रवृत्ती वाढत असताना उभाडे (ता. इगतपुरी) आदिवासी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक जगदीश खैरनार यांनी याच बाबींचा उपयोग करून ई- शैक्षणिक साहित्याचे भव्य दालन तयार केले आहे.
केवळ विद्यार्थीच नाही तर जिल्ह्यासह राज्यभरातील शेकडो शिक्षक ई- शैक्षणिक साहित्याचा वापर आपापल्या शाळांमध्ये करून स्वतःला तंत्रस्नेही म्हणून घडवत आहेत. (Developing technical skills of teachers under the guidance of Jagdish Khairnar nashik news)
संगणक, टॅब, मोबाईल, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर साहित्याचा प्रभावी वापर ते दररोजच्या अध्यापनात करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल युगात आवश्यक असलेले बाळकडू मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी इयत्तानिहाय विविध विषयांवर सुमारे ३०० पेक्षा जास्त व्हिडिओ, १०० पेक्षा जास्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, २०० कृतिपत्रिका, १० ई- बुक्स आणि शेकडो ऑनलाइन प्रश्नमंजूषा तयार केल्या आहेत.
राज्य शासनाच्या दीक्षा ॲपसाठीदेखील त्यांनी वीस व्हिडिओ तयार केले आहेत. एनसीईआरटी माध्यमातून यू- ट्युब लाइव्हद्वारे ई- टूल्सचे राज्यभरातील शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. कोणताही विषय रटाळ वाटू नये म्हणून त्या, त्या विषयासाठी आवश्यक व्हिडिओ, तर कधी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करून विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभागी करून घेतात.
यामुळे खडू, फळा तक्ते या बाबी आता हद्दपार झाल्या आहेत. खैरनार यांनी ज्ञानसाधना नावाचे यू- ट्युब चॅनेल सुरू केले असून त्याचे दहा हजारपेक्षा जास्त सबस्क्राईबर आहेत. याच नावाने त्यांनी ब्लॉगदेखील सुरू केला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या ब्लॉगच्या माध्यमातून ते केवळ विद्यार्थीच नाही तर माझी शाळा व उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा पत्रिका आदी उपयोगी साहित्य अपलोड करत असल्याने शिक्षकांची मोठी सोय झाली आहे.
कोरोनाकाळात डायट नाशिकच्या लर्निंग फॉर्म होम उपक्रमात त्यांनी तयार केलेल्या कृतीपत्रिका आजदेखील विविध शाळांमधून वापरल्या जात आहे. विविध ई- साहित्य तयार करताना जिल्हा परिषदेच्या इगतपुरी तालुक्यातीलच दौंदत येथील शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्नी स्वाती खैरनार (बागूल) यांचे सहकार्य असते, असे ते आवर्जून नमूद करतात.
"२१ व्या शतकातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे." - जगदीश खैरनार, तंत्रस्नेही शिक्षक
"श्री .खैरनार यांनी तयार केलेले ई- शैक्षणिक साहित्य अफलातून आहे. साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखन, वाचन, संभाषण या सर्वच कौशल्यांमध्ये सुधारणा झाली आहे." - गोरक्ष विधाटे, जि. प. शिक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.