Nashik News : तिर्थक्षेत्र त्रंबकेश्वर येथे दर बारावर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी पुरवितात. यात ऐनवेळी केलेल्या विविध विकास कामांचा दर्जाची वाट लागलेली असते.
सगळी एकच घाई झाल्याने त्या कामांचा दर्जा देखील बघितला जात नाही. पर्यायाने कोणी ओरड करूनही त्या काळात दुर्लक्ष करून हा विषय संपविला जातो.(Development works worth crores of rupees but no development was seen anywhere in trimbakeshwar nashik news)
सध्या कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या निधीहून अधिक कोटी रुपयांची कामे शासनाच्या पर्यटन, प्रसाद योजना, यासह विविध विकास योजनेद्वारे मंजूर होऊन कामे सुरु झाली असली तरी प्रसाद योजनेतंर्गत तलाव सुशोभीकरण नावाखाली नुसती डागडुजी केल्यासारखे तर निवृत्तीनाथ समाधी मंदिराच्या परिसरातील बांधकामे, त्रंबकेश्वर येथील नविन वाहनतळ, भुयारी गटार योजना जी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी व गटारीचे पाणी बाहेर काढण्याच्या नावावर सर्व रस्ते खोदून व छोटे पाइप टाकून केलेला हा गोंधळ नागरिक विसरणार नाहीत. शासनस्तरावर विविध विकास योजना मंजूर करून निधी पुरवितात. परंतु त्यातून होणाऱ्या कामांचा दर्जा व ते सतत तपासणी करून व्यवस्थित होतील, या बाबतीत गांभीर्य न बाळगल्याने ही विकास कामे निश्चित भकास स्वरूपात दिसून येत आहेत.
भुयारी गटार योजना (चौतीस कोटी रुपये), तलाव सुशोभीकरण (एक कोटी ते तीन कोटी रुपये), संगमावर इमारत (पाच कोटी), निवृत्तीनाथ समाधी मंदिराच्या परिसरात बांधकाम (बारा कोटी)अशाप्रकारे कोट्यवधींची कामे कुंभमेळ्यापूर्वीच केली जात असताना आता वेगवेगळ्या योजनांची आवश्यकता तरी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती अधिकाराचा वापर
त्रंबकेश्वर देवस्थान सुद्धा सतत मिळणाऱ्या उत्पन्नामुळे प्रसिद्ध आहे. या पूर्वीच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयामुळे काही कामे चांगली झाली आहेत. परंतु येथील दर्शन व्यवस्था व इतरही बाबी वादातीत असल्याने सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. मुळात नूतन विश्वस्त मंडळाबाबतीत अनेकांचा विरोध असूनही हे कसे झाले याबाबतीत चर्चा कायम आहे. अनेकांनी या बाबतीत माहिती अधिकार वापरून काही विषय चव्हाट्यावर आणण्यासाठी कंबर कसली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.