Devidas Pingle esakal
नाशिक

Devidas Pingle | चुंभळे, पाटील, केदारांकडून उच्च न्यायालयाचा अवमान : देवीदास पिंगळे

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील, सुनील केदार राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप करीत असून, ‘ईडी’ची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी केलेले आरोप निर्थरक असून, ज्या प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्याच प्रकरणी पुन्हा आरोप करून ते अक्षरशः न्यायालयाचा अवमान करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी तिघांविरोधात अवमान याचिका आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे माजी खासदार तथा नाशिक कृषी बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. (Devidas Pingle statement about Contempt of High Court by Chumbhale Patil Kedar Nashik News)

पत्रकानुसार नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, भाजपचे पदाधिकारी सुनील केदार यांनी बाजार समितीत देवीदास पिंगळे यांच्या कार्यकाळात ६४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणी थेट ‘ईडी’कडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामुळे पुन्हा एकदा बाजार समितीतील कथित भ्रष्टाचार प्रकाशझोतात आला आहे. श्री. पिंगळे यांनी या सर्व आरोपाचे खंडण केले आहे. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजार समितीने विकासकामांसाठी राज्य बँकेकडून ५२.८१ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकल्यामुळे राज्य बँकेने २००९ मध्ये बाजार समितीची तारण मालमत्ता ‘सिक्युरिटीरायझेशन ॲक्ट’नुसार ताब्यात घेतली होती. नंतर ‘डीआरडी’ कोर्टाच्या आदेशानुसार राज्य बँकेने ही मालमत्ता विक्री केली होती. परंतु, याबाबत लेखपरीक्षकांनी बाजार समितीचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता.

याविरोधात संचालक मंडळाने पणनमंत्र्यांकडे याचिका दाखल केली. पणनमंत्र्यांनी चौकशीअंती खात्री करून संचालक मंडळाला दोषमुक्त केले होते. या विरोधात उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या होत्या. सुनावणीअंती उच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. असे असतानाही काही मंडळी हेतुपुस्सर आणि राजकीय द्वेषापोटी बिनबुडाचे आरोप करीत आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

आरोप करण्याची कारणे

शिवाजी चुंभळे यांच्या कार्यकाळातील बाजार समितीचे झालेले आर्थिक नुकसान व भ्रष्टाचार वेळोवेळी उघड करण्यात आला आहे. सेंट्रल गोदावरी कृषक सोसायटीवर दिनकर पाटील त्यांच्या पॅनलमधून एकमेव निवडून आले होते, त्या वेळी त्यांनी विरोधी गटातील संचालक मंडळास शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर अदखलपात्र तक्रार दाखल आहे. या प्रकरणी संचालक मंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सुनील केदार यांचे राज्य नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत फिल्डिंग लावली होती. मात्र, त्यात पुढे काही झाले नाही. या सर्व कारणामुळे नैराश्यग्रस्त झाल्यामुळे तिघे बेछूट आरोप करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT