Devidas Pingle showing the NOC of District Bank. esakal
नाशिक

NDCC Bank | जिल्हा बॅंकेचे कोणतेही कर्ज मी थकविले नाही : देवीदास पिंगळे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी जिल्हा बँकेचे ११ कोटी कर्ज थकविले असल्याचा आरोप माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला होता, त्याला पिंगळे यांनी उत्तर देताना असे कुठल्याही प्रकारचे कर्ज आपण घेतले नसल्याचे स्पष्टे केले.

यासाठी त्यांनी थेट जिल्हा बँकेची 'एनओसी'च पत्रकारांसमोर सादर केली. श्री. पाटील यांचे आरोप निराधार असल्याचा पुनरुच्चार करीत न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असल्याचेही पिंगळे यांनी स्पष्ट केले. (Devidas Pingle statement regarding NDCC Bank discharged loan nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत श्री. पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला एकहाती सत्ता मिळाली. पाटील यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पाटील यांनी या संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या गावांमध्ये देविदास पिंगळे यांच्या विरोधातील कथित बदनामीकारक मजकूर असलेली पत्रके वाटली होती.

त्यावरून पिंगळे यांनी दिनकर पाटील यांना नोटीस बजावली असून, माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यावर दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा पिंगळे यांच्यावर आरोप केले.

या आरोपांचे श्री. पिंगळे खंडण करीत दिनकर पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच दिनकर पाटील यांनीच सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात खर्च जास्त दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता पिंगळे यांच्या आरोपांना पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT