पंचवटी : गिरणारे पंचक्रोशीत टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण जास्त आहे. सद्यःस्थितीत टोमॅटो बाजारामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होते.
हे रोखण्यासाठी गिरणारे येथे दहा एकरांत गंगाधर थेटे यांच्या नावाने टोमॅटो उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू करणार असल्याची ग्वाही माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.
गिरणारे, वाडगाव, धोंडेगाव, ओझरखेड, आळंदी आदी नऊ विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. (Devidas Pingle statement To start tomato sub market in girnare Nashik News)
नाशिक शेतकी तालुका संघाचे सभापती दिलीपराव थेटे, उपसभापती दिलीप चव्हाण, शरद गायखे, बबन कांगणे, रावसाहेब कोशिरे, विष्णू थेटे, भिकाजी कांडेकर, शांताराम माळोदे, दीपक हगवणे, आशा गायकर, जयराम ढिकले, वाळू काकड, ढवळू फसाळे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सविता तुंगार, संचालक युवराज कोठुळे, निर्मला कड, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, विलास कड आणि सेंट्रल गोदावरीचे संचालक तानाजी पिंगळे, विलास कड, काळू थेटे, पुंडलिक थेटे, राजाराम थेटे, नामदेव गायकर, बापूराव थेटे, किरण कातड, लहानू थेटे, अशोक भोर, भाऊसाहेब थेटे, सुनील मोरे, रमेश (आबा) पिंगळे आदी उपस्थित होते.
सभापती देवीदास पिंगळे म्हणाले, की सहकार क्षेत्रात काम करताना अडचणींना सामोरे जावे लागते. सहा वर्ष नाशिक कारखाना सांभाळला. तीन ते चार वर्ष नफ्यात ठेवला होता. आमदार सरोज आहिरे यांनी मतदारसंघात कामांचा चांगला धडाका लावला होता. ज्यामुळे जवळपास २५ वर्षांचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे.
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, की नवनिर्वाचित शेतकी तालुका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरीहिताचे कामे करावेत. शासनाच्या माध्यमातून काही मदत हवी असल्यास सांगावी. ती मिळवून देणेकामे मी प्रयत्नशील राहील.
परशराम गायकर यांनी प्रास्ताविकात केले. व्ही. वाय. वडघुले, एस. गोरे यांनी सूत्रसंचालन केले. कचरू तांबेरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नऊ विविध कार्यकारी सोसायटी सभापती, उपसभापती संचालक, सभासद व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
...अन् आमदार झाले भावुक
माझा मतदारसंघ इगतपुरी असला तरी नाशिक तालुक्याशी एक वेगळे नाते आहे. निवडणुकांच्या काळात तालुक्यातील माझा मित्रपरिवार हा माझ्या पाठीशी खंबीर होता आणि तो कायम उभा राहील, अशी आशा व्यक्त केली. हे बोलत असताना आमदार खोसकर अक्षरशः उपस्थितांसमोर भावुक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.