chhagan bhujbal esakal
नाशिक

Devna Irrigation Project : देवनाचा प्रकल्पाचा मार्ग सुकर! भुजबळांच्या पाठपुराव्याने फेरनिविदा प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

Devna Irrigation Project : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लाख रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. (Devna Irrigation Project path to easy Bhujbals pursuit of retendering announced nashik news)

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ लाख रकमेच्या या कामाला २१ जानेवारी २०२१ ला जलसंधारण महामंडळाकडून मंजुरी मिळवली होती.

त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ ला जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी ८ कोटी ९५ लाख किमतीला तांत्रिक मान्यता दिली. कोविडमुळे सर्व कामे स्थगित झाली होती. आता ती स्थगिती उठवण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

यामध्ये तीन निविदाधरकांनी निविदा भरल्या. ही निविदा मुख्यमंत्र्यांच्या समितीकडे मंजुरीसाठी गेली. ही योजना वनहद्दीत असल्यामुळे निविदा मंजुरीनंतर तिन्ही निविदा धारकांनी काम करण्यासाठी नकार कळवला.

या कामाची फेरनिविदा काढण्यासाठी भुजबळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कंत्राटदाराला हे काम मिळण्यानंतर कंत्राटदाराने पाठपुरावा करून वन क्लिअरन्स करण्याचे बंधन या कामाच्या अटीशर्तींमध्ये आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्सचे काम होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवना साठवण तलाव हा खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु., या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २.०८ दलघमी (७३.४४ दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३.०० हेक्टर व येवला तालुक्यातील ४४.०० हेक्टर अशी एकूण ५७.०० हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे.

त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खालगी आहे. या योजनेची एकूण किंमत १२ कोटी ७७ लाख असून योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन फॉरेस्ट क्लिअरन्सनंतर या कामाला सुरुवात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT