Devotees from Surat offer 6 kg silver ornaments to Adimaya Saptashrungi Devi Mandir nashik esakal
नाशिक

Saptashrungi Devi Mandir News: सुरत येथील भाविकाचे आदिमाया सप्तशृंगीस 6 किलो चांदीचे दागिने अर्पण

वर्षभरात लाखो भाविक श्री भगवती चरणी नतमस्तक होत असतात व श्री भगवतीस विविध वस्तू, अलंकार, दागिने अशा विविध वस्तू व सेवा अर्पण करत असतात.

दिगंबर पाटोळे

वणी : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती वर्षभरात लाखो भाविक श्री भगवती चरणी नतमस्तक होत असतात व श्री भगवतीस विविध वस्तू, अलंकार, दागिने अशा विविध वस्तू व सेवा अर्पण करत असतात.

अनेक भाविक फुल ना फुलाची पाकळी देण्याकरिता करिता सढळ हाताने देणगी देण्याकरिता पुढे येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे सुरत येथील भाविक मुन्नाभाई व जेनिषभाई सावलानी ग्रुप राम परिवाराने श्री सप्तश्रृंगी देवीच्या चरणी चांदीचे पाऊले, चांदीचा कंबरपट्टा, चांदीचे मुकुट, कानातील कर्णफुले, चांदीची नथ दान असे सर्व मिळून एकूण ६ किलोचे दागिने असून त्यांची अंदाजित रक्कम ही सुमारे ५ लाख ११ हजार इतकी आहे. श्री भगवतीस विविध प्रकारचे दागिने देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे. (Devotees from Surat offer 6 kg silver ornaments to Adimaya Saptashrungi Devi Mandir nashik news)

श्री सप्तशृंगी देवीचे भक्त असलेले राम परिवार हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री भगवती दर्शनासाठी येत आहेत व श्री भगवतीचे सेवेसाठी विविध वस्तू अर्पण करीत असतात मूर्ती संवर्धनानंतर श्री भगवतीच्या सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत ईच्छा व्यक्त केली असता, त्यांच्याशी आवश्यक तो समन्वय कार्यालयीन प्रशासनामार्फत करण्यात आला व त्यांनी श्री भगवतीच्या चरणी भगवतीचे नवीन स्वरूपाला साजेसे असे चांदीचे अलंकार आज सप्तशृंगी देवीची महापूजा करत अर्पण केले.

आज सोमवार, दि. १५/०१/२०२४ रोजी सहकुटुंब श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट देवून श्री भगवतीची पंचामृत महापूजा व महाआरती करून चांदीचे अलंकार ट्रस्टकडे सुपूर्त केला.

प्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT