जुने नाशिक : उरुसमध्ये आलेल्या भाविकांना फालुद्याची भुरळ पडत आहे. सर्वाधिक दुकाने फालुद्याच्या असून, प्रत्येक दुकानात फालुदा (Faluda) सेवन करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा बडी दर्गा उरुस ( झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुधवार (ता. १८) पासून विश्वस्तांच्या विवादात उरुसाला सुरवात झाली. (Devotees in Urus are fascinated by faluda Nashik News)
नागरिकांनी वादात न पडता उरुसाचा आनंद घेत आहे. पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी गर्दी केली आहे. गुरुवारी (ता. १९) दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसांपेक्षा अधिक गर्दी बघावयास मिळाली. आलेल्या प्रत्येक नागरिकास मुख्य आकर्षण असलेल्या फालुद्याची भुरळ पडल्याचे दिसून आले. चिमुकल्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी दर्शनाचा लाभ घेत सरळ फालुद्याच्या दुकानाचा रस्ता धरला. प्रत्येक वर्षी उरुसाचे मुख्य आकर्षण फालुदा ठरले आहे. तरीदेखील या वर्षी फालुदा सेवन करण्यास अधिक गर्दी होण्याचे कारण म्हणजे सध्या दिवसभर उन्हाचा प्रचंड उकाडा जाणवत आहे.
दिवसभराच्या कडाक्याने त्रस्त होऊन सायंकाळी थंडगार फालुदा सेवन करण्याचा आनंद काही निराळा, तसेच सलग दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे उरुस होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना फालुद्याचा आस्वादास मुकावे लागले होते. जनता नागरिकांकडून ती कमी भरून काढली जात आहे. तीस रुपयात हाफ आणि पन्नास रुपयात फूल असा फालुदाचा दर आहे. उरुसनिमित्ताने बडी दर्गा शरीफवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.