Nashik MD Drug Case: एमडी ड्रग्ज प्रकरणात छोटी भाभीच्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती ‘नाशिकमध्य’च्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. (Devyani Farande will file violation of rights against Sushma Andhare nashik news)
खोटे आरोप करून बदनामी केल्यामुळे हा हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फरांदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, अंधारे यांच्याकडे कुठलेही पुरावे नसताना त्यांनी माझी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुढील आठवड्यात सभापतींसमोर हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी जाहीर सभा झाली, त्यावेळी एमडी ड्रग्ज प्रकरणात ‘मोठी भाभी’ असा उल्लेख करून डिवचण्याचा प्रयत्न केला.
त्यावर शुक्रवारी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार फरांदे यांनी चर्चा घडवून आणली.
आमदार फरांदे यांच्याकडे अंगुलिनिर्देश करताना ‘मोठी भाभी’ असे संबोधले होते. त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार फरांदे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरून संतप्त झालेल्या आमदार फरांदे यांनी अंधारे यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याचे जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.