धनुर्मासातील पहिल्या रविवारी सूर्यकिरण आल्यांनतर दिसणारे आदिमायेचे तेजस्वी रूप.  esakal
नाशिक

Nashik News: आदिमाया सप्तशृंगीच्या धनुर्मास उत्सव सुरू; 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार

सकाळ वृत्तसेवा

वणी : आद्यस्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगीमातेच्या धनुर्मास उत्सवास धनुर्मासाच्या पहिल्या रविवार (ता. १७)पासून उत्साहात प्रारंभ झाला.

धनुर्मासातील सकाळी सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडताच ‘आई अंबे की जय’, ‘सप्तश्रृंगीमाते की जय’चा जयघोषाने अवघा सप्तश्रृंगी गड निनादून गेला. (Dhanurmas festival of Adimaya Saptshringi begins continue till January 14 Nashik News)

त्रिगुणात्मक स्वरूपी आद्यस्वयंभू शक्तिपीठ अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव, कोजागीरी उत्सवाप्रमाणेच धनुर्मास उत्सवही मोठ्या भक्तिभावाने केला जातो. धनुर्मास हा सूर्यदेवतेचा उत्सव समजला जातो.

या काळात सूर्यनारायणाची पुजा केली जाते आणि याच काळात सूर्यनारायण दक्षिणायन करतात. या कालावधीत सूर्याचे किरण आदिमायेच्या मूर्तीला स्पर्श करतात. हे दृश्य बघण्यासाठी भाविक गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

रविवारपासून सुरू झालेला धनुर्मास उत्सव १४ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक रविवारी पहाटे पाचला देवीची पंचामृत महापूजा होते. सकाळी सूर्यांची किरण देवीच्या मूर्तीवर येताच देवीची आरती होते.

इतर दिवशी नित्यनियमानुसारच देवीची पूजाविधी होतो. रविवारी री भगवतीस लालरंगाचे महावस्त्र नेसवून सुर्वण अलंकारानी साज शृंगार केला होता.

आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात व मूर्तीवर सूर्यकिरणे येताच आई भगवतीचा उपस्थित भाविकांनी जयघोष केला. नंतर आदिमायेची यजमान भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

धनुर्मासाची माहिती

या काळात सूर्य धनू राशीतून संक्रमण करतो, म्हणून याला धनुर्मास म्हणतात. या मासाला ‘धुंधुरमास’, ‘झुंझुरमास’ अथवा ‘शून्यमास’ असेही म्हणतात.

असे म्हणतात, की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते.

मराठी महिन्यानुसार मार्गशीर्ष व पौष अशा दोन महिन्यांमध्ये येणाऱ्या या महिन्यास ‘शून्यमास’ असेही म्हणतात. या मासात देवदेवतांची पूजनाबरोबरच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते.

तसेच अध्यात्माची आवड असणाऱ्या लोकांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी हा पर्वणीचा काळ समजला जातो. या सर्व पूजाअर्चा सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे होतात. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला, तर या मासात पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताला ओझोन लेअर अतिशय शुद्ध असते.

शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते. तसेच वातावरण प्रदूषणरहित, आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. त्यामुळे या मासात पहाटे फिरावयास जाण्यास, तसेच व्यायाम करण्यास अतिशय महत्त्व दिले आहे. या गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत.

"रविवार सूर्यदेवतेचा वार असून, त्या दिवशी आई सप्तशृंगीच्या पूजेच्या माध्यमातून सूर्यदेवतेची पूजा होते. मासातील प्रत्येक रविवारी श्री भगवतीच्या पंचामृत महापूजेला पहाटे पाचला प्रारंभ होतो. या पूजेची आरती तेव्हाच पार पडते, जेव्हा सूर्यनारायणाची किरणे आईच्या चरणावर येतात. या क्षणानंतर मोठ्या जयघोषात आरतीस प्रारंभ होतो. नंतर देवीस उष्णतावर्धक असलेल्या विशिष्ट पदार्थ गुळाच्या पोळ्या, मुगाची खिचडी, तिळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू, वांग्याचे भरीत, लोणी आदी पदार्थांचा समावेश असलेला नैवेद्य दाखविला जातो."

-धनंजय दीक्षित, देवीचे पुजारी तथा अध्यक्ष पुरोहित संघ, सप्तश्रृंगी गड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT