A meeting of Sadhus and Mahants of Dashnami Akhara was held on Wednesday at Niranjani Akhara. esakal
नाशिक

Trimbakeshwar Maha Shivratri : त्र्यंबकेश्‍वरमध्ये महाशिवरात्रीला मिरवणुकीने ज्योतिर्लिंगाचे दर्शन

दशनामी आखाड्याच्या बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : येथील निरंजनी आखाड्यात दशनामी आखाड्यातील साधु-महंत-मंडपेश्‍वरांच्या संयुक्त बैठकीत महाशिवरात्रीला कुशावर्तात तीर्थस्नान झाल्यावर मिरवणुकीने ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जाण्याचा बुधवारी (ता. ८) निर्णय घेण्यात आला.

१८ फेब्रुवारीला पहाटे साडेतीनला एकत्र जमण्याचे ठरले. तसेच कुशावर्तातून मेन रोडला सवाद्य दर्शनास जाण्याचे ठरवण्यात आले. (Dharshan of Jyotirlinga on Maha Shivratri in Trimbakeshwar nashik news)

निरंजनी आखाड्यात १७ फेब्रुवारीला भंडारा होणार आहे. बैठकीस निरंजनी आघाड्याचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, पंच दशनामी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरी, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती आनंद आखाडा,

सचिव महंत सहजानंदगिरी, महंत अजयपुरी, महंत बृहस्पती गिरी, महंत ठाणापती धनंजय गिरी, ठाणापती महंत छबिरामपुरी, आर्यानंद सरस्वती, ठाणापती महंत गोपालदास, महंत ठाणापती देवीदासजी, महंत ठाणापती लखन गिरी,

महंत ठाणापती विश्वनाथ, महंत जयदेव गिरी, महंत शिवानंद गिरी, महंत स्वात्मानंद पुरी आदी उपस्थित होते. महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती यांनी महाशिवरात्र शंभू महादेवाचा महोत्सव असल्याने सर्व साधु व महंत यांनी आनंदाने हा धार्मिक उत्सव साजरा करावा, असे सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

महामंडलेश्वर शिवगिरी यांनी महाशिवरात्र हा भक्तीचा दिवस असल्याने साधु, महंत व सर्व भक्तांनी कोणत्याही प्रकारच्या अहंपणा न अंगीकारता हा सोहळा साजरा करावा, असे स्पष्ट केले.

नया उदासीन आखाड्याचे ठाणापती महंत गोपालदास यांनी काही मुद्दे उपस्थित केल्यावर वाद झाले. त्यावर महंत शंकरानंद सरस्वती व दोन्ही महामंडलेश्वर यांनी इतर विषय व वाद आणू नयेत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT