Subhash Bhamre, Shobha Bachhao
Subhash Bhamre, Shobha Bachhao esakal
नाशिक

Dhule Lok Sabha Election 2024 Result : मालेगाव बाह्यमध्ये भामरेंना मताधिक्क्य, डॉ. बच्छावांचीही पाठराखण!

गोकूळ खैरनार

धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाने नेहमीप्रमाणे भाजपला साथ दिली. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना ५५ हजार २१२ एवढे मताधिक्य मिळाले. गतवेळी ते ९४ हजार १४७ एवढे होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी अंत्यत कमी वेळेत मुसंडी मारत मतदारसंघातून तब्बल ७२ हजार २४२ मते घेतली.

महागाई, बेरोजगारी, कांदा प्रश्‍न आदींसह डॉ. भामरे यांच्या संदर्भात असलेल्या ॲन्टी इन्कमबन्सीचा फटका त्यांना काही प्रमाणात बसला. प्रतिकूल परिस्थितीत पालकमंत्री दादा भुसे व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. भामरे यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले, मात्र डॉ. भामरे यांचा निसटता पराभव महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चटका लावून गेला. (Dhule Lok Sabha Election 2024 Result Malegaon bahya Factor)

गेल्या चार लोकसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य नेहमीच भाजप उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. मालेगाव मध्यमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला मिळालेले मताधिक्य कमी करण्याची जबाबदारी जणू मालेगाव बाह्य आजवर पेलत आला आहे. मालेगाव मध्यची आघाडी कमी करतानाच भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर करण्याची भूमिका मालेगाव बाह्य बजावत आला आहे.

कॅम्प- संगमेश्‍वर, कलेक्टरपट्टा, सटाणा नाका या शहरी भागासह तालुक्यातील ९७ गावांचा मतदारसंघात समावेश आहे. यंदा शहरी भागात मतदानाचा टक्का कमी झाला. तुलनेने ग्रामीण भागात चांगले मतदान झाले. २ लाख १० हजार ७७४ एवढे मतदान झाल्याने डॉ. भामरे यांना आघाडी किती मिळेल याचीच पंधरा दिवस चर्चा होती.

पालकमंत्री दादा भुसे यांनी शिर्डी, नाशिकची जबाबदारी सांभाळतांनाच डॉ. भामरेंच्या प्रचाराची मोट बांधली. भाजप नेते सुनील गायकवाड, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरासह गाव पातळीपर्यंत प्रचार पोहोचवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची येथील सभा वातावरण निर्मितीसाठी फायदेशीर ठरली. महायुतीच्या परिश्रमामुळे डॉ. भामरे यांना तब्बल १ लाख २७ हजार ४५४ एवढी मते मिळाली. (latest marathi news)

अद्वय हिरेंच्या पाठिंब्याचा फायदा

दुसरीकडे नवख्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस नेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र भोसले, बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण आदींनी डॉ. बच्छाव यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी दिलेला पाठिंबा डॉ. बच्छाव व त्यांच्या समर्थकांना नवीन ऊर्जा देऊन गेला. पवन ठाकरे, लकी खैरनार आदींसह पदाधिकाऱ्यांनी अत्यंत कमी वेळेत श्री. हिरे यांचा निर्णय गाव पातळीपर्यंत पोहोचविला. याचा फायदा घेत डॉ. बच्छाव यांनी मुसंडी मारत तब्बल ७२ हजार २४२ मते खेचून आणली. ही मते त्यांना विजयासाठी साथ देऊन गेली.

ओव्हरकॉन्फिडन्सने केला घात

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाने नेहमीप्रमाणे भाजप उमेदवार डॉ. भामरे यांना घसघशीत आघाडी मिळवून दिली. असे असताना त्यांचा निसटता पराभव झाला. डॉ. भामरे यांची उमेदवारी पक्षाने खूपच लवकर जाहीर केली. या तुलनेत कॉंग्रेसने अखेरच्या क्षणी डॉ. बच्छाव यांना उमेदवारी दिली. नवख्या व बाहेरच्या म्हणून डॉ. बच्छाव यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

निवडणूक एकतर्फी असल्याचे भाजपचे नेते उघडपणे बोलत होते. यातून संपूर्ण मतदारसंघात ओव्हरकॉंफिडन्स देखील नडला. या पराभवाचे विश्‍लेषण करताना अनेक बाबींचा ऊहापोह कार्यकर्ते करीत आहेत. भाजपकडून धुळे लोकसभेसाठी तब्बल अर्धा डझन उमेदवार इच्छुक होते. उमेदवार बदलला असता तर चित्र वेगळे राहिले असते असा मतप्रवाहही व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भयानक अपघात! 70 प्रवासी असलेली बस कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Jagannath Rath Yatra 2024: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

MS Dhoni Birthday: 'भाईजान'सोबतच्या वाढदिवशी धोनीला CSK च्या कर्णधाराचा आला व्हिडिओ कॉल, Photo व्हायरल

Mahua Moitra FIR: बेताल वक्तव्य भोवलं! महुआ मोईत्रांविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT