Dhule Lok Sabha Election
Dhule Lok Sabha Election  esakal
नाशिक

Dhule Lok Sabha Election : धुळ्यात यंदा 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

नामपूर : निवडणूक कोणतीही असो, ती लढविताना आपली पत अर्थात जनाधार असणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान एकूण मतदानाच्या सुमारे १६.६६ टक्के मते मिळायला हवी, अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा असते. अन्यथा निवडणूक काळात भरलेले डिपॉझिट शासन दरबारी जमा करण्याची नामुष्की उमेदवारांवर ओढवते. (Dhule Lok Sabha Election)

धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तुल्यबळ निवडणूक झाली असली तरी, अन्य राजकीय पक्षांसह, अपक्ष मिळून तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यातील एकाही उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार निर्धारित मतांचा टप्पा न गाठता आल्याने महायुती, आघाडी वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

भारती जनता पक्षाकडून माजी संरक्षण राज्यमंत्री, विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (५ लाख ८० हजार ०३५ मते) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसच्या माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (५ लाख ८३ हजारब८८६ मते) यांनी त्यांचा ३ हजार ८३१ मतांनी निसटता पराभव करून देशपातळीवर चर्चेत आल्या. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासह अनामत रक्कम जमा करावी लागते.

खुल्या गटातील उमेदवारास २५ हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमाती वर्गातील उमेदवारांना ५० टक्के म्हणजे साडेबारा हजार रुपये अर्जासोबत भरावे लागतात. मात्र, ही रक्कम ठराविक मते प्राप्त न झाल्यास जप्त करण्याची म्हणजे शासन जमा करण्याची तरतूद आहे. लोकसभा निवडणुकीत नोटा वगळून नोंदविण्यात आलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते प्राप्त न झाल्याने १६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले. (latest marathi news)

या उमेदवारांची डिपॉझिट जप्त

बहुजन समाज पक्ष, भारतीय जवान किसान पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉग, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, भीम सेना आदी पक्षांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. धुळे लोकसभा निवडणुकीत नोटा वगळून १२ लाख १४ हजार ५७६ मतांची नोंद झाली. त्यापैकी अपेक्षित २ लाख २ हजार ४२९ मते प्राप्त न झाल्याने १६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

अनामत रक्कम शासनजमा झालेल्या उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टीचे अझर अहमद मोहम्मद युसुफ ४ हजार ९७३, भारतीय जवान किसान पार्टीचे नामदेव येळवे ३ हजार ६८३, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे शिवाजी पाटील १ हजार १, भीमसेनेचे मुकीम नगरी ७८१, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे शेख मोहम्मद ९५१.

अपक्ष अब्दुल हापिज ५७७, इरफान मोहम्मद इसाक ७६३, भरत जाधव १९ हजार ७१३, मलय पाटील ७३६, मोहम्मद अमीन मोहम्मद फारुख ८३५, मोहम्मद इस्माईल जुमन १०८५, राज चव्हाण ३ हजार ४५२, शफिक अहमद ३ हजार ७०७, ऍड. सचिन निकम ३ हजार ६६०, सुरेश ब्राह्मणकर १ हजार ०३८, संजय शर्मा ३ हजार ७४६ यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भयानक अपघात! 70 प्रवासी असलेली बस कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Jagannath Rath Yatra 2024: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

MS Dhoni Birthday: 'भाईजान'सोबतच्या वाढदिवशी धोनीला CSK च्या कर्णधाराचा आला व्हिडिओ कॉल, Photo व्हायरल

Mahua Moitra FIR: बेताल वक्तव्य भोवलं! महुआ मोईत्रांविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT