A meeting of the India Alliance was held in the background of the upcoming elections esakal
नाशिक

INDIA Alliance: इंडिया आघाडीकडून नाशिकमध्ये निवडणुकांचा बिगुल! नौटंकी सरकारचे दिवस भरल्याचा घनाघात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र व राज्यातील नौटंकी सरकारचे दिवस भरले असून, भांडवलदारांचे चोचले पुरवणारे हे सरकार थोड्याच दिवसांसाठी सत्तेत आहे, असा दावा करताना निवडणुका जिंकण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भक्कम वज्रमूठ ठेवण्याचे आवाहन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केले. (dicussion of elections in Nashik from India Alliance nashik political)

वेद मंदिराजवळील एका हॉलमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री बबनराव घोलप, शोभा बच्छाव, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड,

प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, ज्येष्ठ नेते शरद आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, डाव्या पक्षाचे माजी ज्येष्ठ आमदार जिवा पांडू गावित, ॲड. तानाजी जायभावे, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप,

संपर्कनेते जयंत दिंडे यांसह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे, शिवाजी सहाणे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, ज्येष्ठ नेते कराड, माणिकराव शिंदे, देवानंद बिरारी, राजेंद्र मोगल आदी या वेळी उपस्थित होते.

भाजपप्रणीत महायुती विरुद्ध संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. केंद्र व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही सरकारांना खाली खेचण्यासाठी एकजुटीने मुकाबला करून संयुक्तरीत्या भक्कम यंत्रणा उभारण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

पेट्रोल, डिझेलचे गगनाला भिडलेले भाव, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर, बेरोजगारी या बाबींवर चर्चा करताना केंद्र व राज्य सरकार यांना नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी काहीही सोयरसुतक नसल्याची टीका करण्यात आली.

जनतेच्या भावनांशी खेळणारे, धूळफेक करणारे नोटंकीबाज व भांडवलदारांचे चोचले पुरवणारे हे सरकार आहे. या सरकाराचे दिवस आता भरले असून, आगामी निवडणुकांमध्ये केंद्र व राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे विविध नेत्यांनी भाषणात सांगितले.

नाशिक महापालिका. तसेच जिल्हा परिषदा, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भक्कम वजन करणे गरजेचे असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले.

संयुक्तरीत्या यंत्रणा सक्षम करणार

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करण्याचा एक भाग म्हणून संयुक्तरीत्या बूथ व प्रभागनिहाय यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

प्रभाग व विभागणी संयुक्त दौरेदेखील काढले जाणार आहे. त्याचप्रमाणे संयुक्तरीत्या बूथ पातळीवर इंडिया आघाडीच्या कोर कमिटीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT