नाशिक : कोरोना विषाणूपासून बचाव होण्यासाठी व कोरोनामुक्ततेसाठी आहारात जास्तीत जास्त कडधान्ये व व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. यातून मिनरल्स व व्हिटॅमिन्स मिळतात. तसेच श्रावणात पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे बद्धकोष्ठता व पोटाचे विकार जडतात. त्यामुळे याकाळात नैसर्गिक, पौष्टिक व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता. २१)पासून सुरू होत असलेल्या श्रावण मासारंभातील आहार-विहाराविषयी तज्ज्ञांचा सल्ला...
दुधासोबत घ्या अंजीर-मनुके-बदाम अन् तुपात परतलेले खजूर
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा, आवळ्याचा रस, किवी, नारळपाणी यांचा रोज वापर केला पाहिजे. तसेच कडधान्यामध्ये मोड आलेले चणे, मूग, चवळीचा समावेश आहारात असावा. काकडी, आमसुलाचे सरबत, ओवा, सुंठ, हिंग, दालचिनी, मसाल्याचे पदार्थ उपयुक्त ठरतात. रोज सकाळी दुधाबरोबर अंजीर, मनुके, बदाम, तुपात परतलेली खजूर खाल्याने हिमोग्लोबिन वाढते. अक्रोड, जवस खाल्ल्याने सांधेदुखीसारखे विकार कमी होतात. - मीनल बाकरे-शिंपी, आशीर्वाद योग नॅचरोपॅथी
लिंबूपाणी, ज्यूसचा समावेश
आरोग्यदायी जीवनासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त आहार व योग निसर्गोपचाराचा अवलंब करून माणसाला कोरोनामुक्त जीवनाचा आधार मिळू शकतो. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपवासाच्या पदार्थांचे सेवन न करता दिवसातून दोन-तीन फळे, लिंबूपाणी, ज्यूसचा समावेश करायला हवा.
नैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे - आहारतज्ज्ञांचे मत
फराळाचे पदार्थ पचनास जड असल्याने पोटाचे विकार, ॲसिडिटी, लठ्ठपणा, डोकेदुखी, पोट साफ न होणे असे विकार जडतात. श्रावणात लिंबू, मोसंबी, पेरू, डाळिंब, पनीर, ताक या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार-विहाराशिवाय पर्याय नाही. कोरोनाकाळात पचन इंद्रियांना विश्रांती देण्यासाठी फळांच्या रसाचे सेवन करणे महत्त्वपूर्ण आहे. तसेच दैनंदिन आहारात फळभाज्या व मोड आलेल्या कडधान्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर सकाळी लवकर उठून लिंबू-पाणी अथवा मोसंबीचा ज्यूस घेऊन अर्धा तास चालले पाहिजे. त्यानंतर योग व प्राणायाम करायला हवा. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावयास हवे. नैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!
रिपोर्टर : भाग्यश्री गुरव
(संपादन - ज्योती देवरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.