खामखेडा (जि. नाशिक) : आपण राष्ट्रकुल बँकांमधील खातेधारकांना विचारल्यास मागील काही महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली आहे काय? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे.
गेल्या वर्षभरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले आहेत. त्या परिणाम आधीच बँकांच्या कॅश काऊंटरवर झाला होता. आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. (Digital India increasing uses of online banking Due to digital transactions ATMs not used Nashik News)
एटीएमच्या गर्दीवर परिणाम
महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख रक्कम काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाहीत.
देवळ्यातील एका बँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ३८ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात. जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ४५८ एटीएम आहेत. त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक, तर एचडीएफसी बँकेचे शंभरहुन अधिक एटीएम आहेत.
डिजिटल व्यवहाराकडे वाढता कल
डिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशांची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. पान टपरीपासून सर्वच व्यावसायिकांकडे आता क्यूआर कोड उपलब्ध असल्याने ऑनलाईन पेमेंट सुविधा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाव- खेड्यातील लोक याचा वापर करू लागले आहेत.
पेट्रोल पंपावर ५० टक्के डिजिटल
मागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. पेट्रोल पंपावर दररोज होणाऱ्या व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत असल्याचे पेट्रोल पंप व्यावसायिक सांगतात.
व्यवहारात वाढला ‘यूपीआय’चा वापर
सध्या देशात दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. दीपावलीतील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला या दोन्ही महिन्यातील आकडेवारी सुमारे ४० लाख कोटीपर्यंत असल्याचे फायनान्स विभागाने सांगितले.
पगार खिशातच
वर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर अनेक विभागाचे कर्मचारी पगार करण्यासाठी बँकांमध्ये तसेच, एटीएममधून काढून घरी आणत. आता अनेक जण महिनोनमहिने एटीएममध्ये जातच नाहीत. यामुळे नागरिकांचे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहेत.
"कोरोनानंतर ७० टक्क्यांहून अधिक ग्राहक युपीआयने पेमेंट करतात. त्यामुळे रोख रक्कमदेखील आता दिवसभरात फारच कमी झालेली आहे."
- अमित मोरे, व्यावसायिक, खामखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.