Digital artwork created by Pradeep Devere esakal
नाशिक

Nashik News: बोकडदरेचे शिक्षक प्रदीप देवरे यांच्या उपक्रमांचा राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

निफाड : तालुक्यातील बोकडदरे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप देवरे डिजिटल कृतिपत्रिकेतून शेकडो विद्यार्थ्यांची इंग्रजी समृद्धी करीत आहेत.

मोबाईलचा मनोरंजक अभ्यासासाठी वापर करण्याचा विचार करून प्रदीप देवरे रोज एक डिजिटल कृतिपत्रिका तयार करून विविध व्हॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आव्हानात्मक अभ्यास देत आहेत. (Digital textbooks way to enrich English Bokadare teacher Pradeep Devre activities benefit students of state Nashik)

आजपर्यंत त्यांनी १५५ इंग्रजीच्या कृतिपत्रिका तयार करून पाठविल्या आहेत. टॉप वर्कशीट या वेब बेस्ड टूलचा वापर करून मॅचिंग, ड्रॅग ॲन्ड ड्रॉप, सिलेक्ट फ्रॉम ड्रॉपडाउन, ड्रॉ ॲन्ड राईट, चेक बॉक्स, क्रॉसवर्ड पझल्स आदी आंतरक्रियात्मक टॅबचा वापर करून इंग्रजीच्या पायाभूत घटकांवर कृतिपत्रिका तयार केल्या जातात.

त्याची लिंक विद्यार्थ्यांना पाठवून त्यांना ती कृतिपत्रिका मोबाईलवर सोडवता येते. ती सोडविल्यानंतर लगेच ऑटो चेक होऊन विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळतात. यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होतो व त्यांचे मनोरंजनातून शिकणेही होते.

या उपक्रमामुळे राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांची सुट्टीतील शैक्षणिक कमतरता (लर्निंग लॉस) भरून निघतेय. या कृतिपत्रिका विद्यार्थी दिवसभरात कधीही, कुठेही सोडवू शकतात. कागदाचीही बचत होते.

विद्यार्थ्यांना डिजिटल गेम खेळण्याकडून अभ्यासाकडे वळवता येते. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना त्यांची अध्ययन स्थिती लक्षात येते. त्यामुळे लर्निंग गॅप भरून काढण्यास मदत होते.

श्री. देवरे यांनी आजपर्यंत सगळ्या कृतिपत्रिका त्यांच्या pradipdeore12.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या आहेत आणि हा उपक्रम ते वर्षभर राबविणार आहेत. त्यांच्या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

"राज्यभरात पायाभूत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्यात शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक भागधारक प्रयत्न करीत आहे. उन्हाळी सुट्टीत प्रदीप देवरे यांचा डिजिटल कृतिपत्रिका हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पूरक ठरत आहे."

- लता भरसट, गटशिक्षणाधिकारी, निफाड

"डिजिटल कृतिपत्रिका विनाकागद विनापेन मनोरंजनातून सोडविवण्याची प्रश्न मालिका आहे. राज्यभरातील विद्यार्थी खूप आनंदाने ते सोडवत आहेत."

-प्रदीप देवरे, प्राथमिक शिक्षक, बोकडदरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT