A library in a public library esakal
नाशिक

Nashik Public Library: सार्वजनिक वाचनालयात डिजिटयाजेशन नावापुरतेच! वाचकांना ग्रंथसंपदा मिळण्यास अडचणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Public Library : १८२ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात ग्रंथसंपदेचे डिजिटयझेशन करण्यात आले आहे हे खरे. मात्र हे डिजिटयझेशन देखावाच असल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक वाचनालयात सद्य:स्थितीत जवळपास पावणेदोन लाखांची ग्रंथसंपदा असून, वाचकांना हवी ती ग्रंथसंपदा मिळण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. वाचकांना मागेल ती पुस्तके मिळत नसल्याने त्यांना पर्यायी पुस्तकावर समाधान मानावे लागते.

असे असले तरी ९९ टक्के सभासदाने मागेल ती पुस्तके उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावाही वाचनालयाकडून केला जात आहे. (Digitization in public library only in name Difficulties in accessing library for readers nashik)

सार्वजनिक वाचनालय आणि गंगापूर रोडवरील शाखेत दररोज जवळपास चारशेवर पुस्तकांची देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण सोपी व्हावी यासाठी सार्वजनिक वाचनालयाचे गतवर्षी वाजागाज करत डिजिटयजेशनही करण्यात आले आहे.

डिजिटयजेशनमुळे पुस्तकांचे नाव किंवा लेखकाचे नाव वाचक सभासदाने सांगितल्यास एका क्लिकवर ग्रंथसंपदा मिळण्यास मदत झाली. पण दुसरीकडे वाचनालयात हवी ती पुस्तके मिळण्यासाठी ओपन ॲक्सेस ही संकल्पना असल्याने वाचक सभासद पुस्तके जागेवर न ठेवता इतरत्र ठेवत आहे.

त्यामुळे वाचनालयातील कर्मचाऱ्यांना एका क्लिवर पुस्तके मिळण्याऐवजी पुस्तके शोधण्यातच बराचसा वेळ जात असल्याचे चित्र आहे. वाचक सभासदांनी मागितलेले पुस्तक न सापडल्यास कर्मचाऱ्यांकडून पर्यायी पुस्तक देण्यात येत आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाचनालयातील सभासदांनी इतरत्र ठेवलेली पुस्तके वाचनालयातील कर्मचारी आठ दिवसांत आढावा घेऊन इतरत्र असलेली पुस्तके जागेवर ठेवत असल्याचा दावाही वाचनालयाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ओपन ॲक्सेसमुळे पुस्तके मिळेना

सार्वजनिक वाचनालयात सभासदांना पुस्तके घेण्यासाठी थेट प्रवेश असल्याने हे सभासदांसाठी सोयीचे आहे. मात्र काही सभासद एखादे पुस्तक वाचण्यासाठी काढल्यानंतर पुस्तक त्याच जागेवर न ठेवता इतरत्र ठेवतात.

त्यामुळे एका क्लिकवर मिळणाऱ्या पुस्तकासाठी दुसऱ्या सभासदाला या ओपन ॲक्सेसमुळे ताटकळत थांबावे लागते, किंवा त्याच विषयाचे पर्यायी पुस्तके वाचण्यासाठी वाचनालयातील कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध करून दिले जाते. यामुळे काही सभासदांना त्या पुस्तकात मिळणारे संदर्भ पर्यायी पुस्तकात शोधावे लागत असल्याची स्थिती आहे.

"ओपन ॲक्ससमुळे पुस्तके इतरत्र ठेवली जातात. त्यामुळे पुस्तके मिळण्यास अडचणी होतात, ही गोष्ट नाकारून चालणार नाही.सार्वजनिक वाचनालयात पुस्तके मिळण्यासाठी एखाद्यालाच ताटकळत थांबावे लागत असेल पण ९९ टक्के वाचकांना मागेल ती पुस्तके दिली जातात."

- जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथ सचिव, सार्वजनिक वाचनालय नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT