Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणूकीत यंदा दुहेरी लढत पाहायला मिळाली. या लढतीमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार भारती पवार यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर भगरे हे आमने सामने होते. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला असला तरी यंदाच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याने भाजपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
दिंडोरीत २०१९ च्या निवडणुकीत ६५.६५ टक्के मतदान झाले होते, २०२४ साली यापेक्षा एक टक्का मतदान जास्त झाल्याचे समोर आले होते.
मतदारसंघ..........पुरुष.............महिला...........एकूण..........टक्के
नांदगाव..........१,०७,१४१.........८६,५१५...........१,९३,६५७.....५८.२४
कळवण-सुरगाणा............१,१०,८६७........९७,५५३...........२,०८,४२०.....७०.८९
चांदवड-देवळा............१,११,४५८..........८८,०३९..........१,९९,४९७.....६६.६५
येवला..............१,१५,४७२..........९०,१९६...........२,०५,६६९....६०.१३
निफाड............१,०४,१३१...........८३,२९४...........१,८७,४२५....६४.३१
दिंडोरी-पेठ............१,३०,३३०............१,१२,१८०........२,४२,५१२.....७५.४२
एकूण..............६,७९,३९९...........५,५७,७७७.........१२,३७,१८०...६६.७५
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोकणा, हिंदू महादेव कोळी, मराठा-कुणबी, वंजारी अधिक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे प्रभावी ठरत आलेली आहेत. या मतदारसंघात दिंडोरी (पेठ), कळवण (सुरगाणा), नांदगाव, येवला, चांदवड (देवळा) व निफाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी नितीन पवार (कळवण), दिलीप बनकर (निफाड), मंत्री छगन भुजबळ (येवला), नरहरी झिरवाळ (दिंडोरी) एक चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. ते सध्या अजित पवार गटात आहेत. विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभेला भाजप असे येथील समीकरण राहिले आहे.
या मतदारसंघावर निर्मितीपासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २००४ पासून या मतदारसंघात भाजपचा खासदार राहिला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. भारती पवार (भाजप) यांना ५,६७,४७० इतकी विजयी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जे. पी.गावित (माकपा) १,०९,५७० मते मिळवली होती. वंचितचे उमेदवार बापू बर्डे यांना ५८,८४७ इतकी मते मिळाली होती. यंदा मकपने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने भास्कर भगरे यांचे बळ नक्कीच वाढले होते.
दिंडोरी आदिवासीबहुल असलेला हा मतदारसंघ आजतागायत विकासापासून वंचित राहिला आहे, त्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने शेतमालाच्या किंमती, कांदा निर्यातबंदी, खतांच्या वाढलेल्या किमती, रखडलेले प्रस्तावीत प्रक्रिया उद्योग हे या मतदारसंघातील जटिल प्रश्न आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.