Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात 34 इच्छुक; अवघे तिघांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीविषयी कमालीची शांतता असताना उमेदवारी अर्ज सादर करण्यासही इच्छुक तयार नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन दिवसांत येथील ३४ इच्छुकांनी तब्बल ७३ अर्ज घेतले आहेत. पण त्यापैकी अवघे तीनच अर्ज सादर झाले आहेत. महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी अर्ज सादर केला. ()

पण ‘एबी’ फॉर्म अद्याप जोडलेला नाही. त्यांना एबी फॉर्म मिळाला असून, गुरुवारी (ता. २) ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. या व्यतिरिक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष चौधरी यांनी पहिल्याच दिवशी अर्ज सादर करून दिंडोरीचे खाते उघडले. मंगळवारी (ता. ३०) एकही अर्ज सादर झाला नाही. फक्त आठ व्यक्तींनी बारा अर्ज घेतले.

अर्ज घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसत असली तरी सादर करणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे निवडणुकीत रंगत येत नसल्याचे दिसून येते. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाली. पण नाशिकचा उमेदवार ठरत नसल्यामुळे त्यांनाही अर्ज भरणे शक्य झालेले नाही. त्यांनी अर्ज घेऊन साडेबारा हजार रुपये अनामत रक्कमही भरून ठेवली आहे.  (Nashik Political News)

या मतदारसंघात आता माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण हे अपक्ष उमेदवारी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फे मालती थविल यांचा अर्ज शुक्रवारी सादर होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा आकडा तरी पार होणार का, याविषयी उत्सुकता लागून आहे.

प्रचारातही शांतता

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वच आघाड्यांवर शांतता दिसून येते. उमेदवारांना अर्ज भरण्याची गडबड आणि नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू असल्यामुळे कार्यकर्तेही निर्धास्त झाले आहेत. प्रचार तोफाही थंडावल्याने जणू काही निवडणूक पार पडल्यासारखे वातावरण या मतदारसंघात दिसून येते. एखाद्या नेत्याची तालुक्याच्या ठिकाणी सभा होताना दिसते, तेवढीच गर्दी जमवण्यासाठी पक्षाचे नेते धावपळ करताना दिसतात. उर्वरित दिवस कार्यकर्त्यांच्या गोटातही कमालीची शांतता दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT