Dindori Lok Sabha Constituency Sharad Pawar, Jayanti Patil, JP Gavit esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency: माकपच्या भूमिकेबाबत पवारांशी चर्चेअंती तोडगा काढू : पाटील; जे. पी. गावित मात्र उमेदवारीवर ठाम

Political News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरविले आहे

सकाळ वृत्तसेवा

Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभेची जागा द्या, अन्यथा शरद पवार गटाचा उमेदवार पडणारच, असा इशारा माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला. यावर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी आमदार जे. पी. गावित यांच्यात बैठक झाली.

मात्र, त्यातूनही तोडगा निघू शकला नाही. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिलेला प्रस्ताव गावित यांनी फेटाळून लावला. उमेदवारीबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करू, लवकरच याबाबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना सांगितले. (Dindori Lok Sabha Constituency JP Gavit fix candidature marathi news)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरविले आहे. यात, आघाडीतील घटक पक्ष माकपने दिंडोरी मतदारसंघाची मागणी करीत उमेदवारी मागितली. उमेदवारी न मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार माजी आमदार गावित यांनी दिंडोरीत झालेल्या समर्थक मेळाव्यात केला.

महाविकास आघाडीकडे उमेदवारीबाबत प्रस्ताव मागितल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी (ता. २०) सकाळी अचानक ओझर विमानतळावर आले असता विमानतळासमोरील एका फार्म हाउसवर त्यांनी ‘राष्ट्रवादी’ची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील यांनी गावित, माकपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांची बंद दरवाजाआड भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

गावित यांनी दिंडोरी मतदारसंघ माकपला सोडण्यात यावा, धर्मांध शक्तीविरोधात आम्ही आघाडीबरोबर आहोत. या मतदारसंघात आमचे प्राबल्य असल्याने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. पक्षाने दिलेला उमेदवार मतदारसंघात चालणार नसल्याने उमेदवारी बदलून आम्हाला जागा द्यावी, अशी मागणी केली.

त्यावर, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दिंडोरीची जागा आमच्या वाट्याला आली आहे. या वाटाघाटीत विधानसभा निवडणुकीसाठी माकपला विधानसभा मतदारसंघ सोडण्याबाबाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळे आपण उमेदवारी मागे घ्यावी, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी, ही मागणी लावून धरली. एक तास चाललेली बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. (Nashik Political News)

बंडखोरी न करण्याची माकपची खात्री

माकपने आम्हाला खात्री दिली, बंडखोरी होणार नाही. शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा राहील. मला खात्री आहे, की त्यांना समजावून सांगितले जाईल, ते निष्ठावंत आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे ते नेते आहेत. त्यांची निष्ठा कुठे ढळेल, असे वाटत नाही. दिल्लीपासून नाशिकपर्यंत माकपच्या नेत्यांशी शरद पवार बोलले आहेत. कोणी उभा राहणार असेल तर त्याला समजावून सांगितले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

"महाविकास आघाडीचा धर्म केवळ आम्हीच पाळायचा का, त्यांनीही तो पाळावा. मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यासाठी उमेदवारीची मागणी करीत आहोत. आमच्या उमेदवारीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा विळा-हातोडा चिन्हावर आम्ही लढू."

- डॉ. डी. एल. कराड, राज्य उपाध्यक्ष, माकप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT