A crowd of candidates and supporters gathered on Thursday during the retreat of Bazar Committee elections. esakal
नाशिक

Dindori Market Committee : दिंडोरीत दोन्ही पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार! 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Dindori Market Committee : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकूण १०७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

या निवडणुकीत दोन पॅनेलची निर्मिती झाली असून दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार असल्याने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढण्याचा निश्‍चय दोन्ही पॅनेलच्या नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत वाढणार असल्याचे चिन्हे दिसून आली आहे. (Dindori Market Committee All party candidates in both panels in Dindori 42 candidates in fray for 18 seats nashik news)

विद्यमान सभापती दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनेल तर माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, नरेंद्र जाधव, विलास कड, शहाजी सोमवंशी, प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलची निर्मित्ती झाली आहे.

छाननीअंती १४९ अर्ज शिल्लक राहिलेले होते. माघारीच्या अंतिम दिवशी एकुण १०७ उमेदवारांनी माघारी घेतली. एकुण १८ जागांसाठी ४२ उमेदवारांनी नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.

पॅनेलची निर्मित्ती होत असताना दोन्ही पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असल्याने या निवडणुकीत पक्षिय हेवेदावे बाजूला ठेऊन विचाराने एकत्र येऊन या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

शेतकरी उत्कर्ष पॅनेलतर्फे केलेल्या विकासावर मतदारांपर्यंत पोहचत मते मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवर्तन पॅनेलनेही वैयक्तिक टिकाटिपणी करण्यापेक्षा संधी दिल्यास त्याचे सोने करून बाजार समितीचा विकास करून दाखवण्याचा विश्‍वास मतदारांना देण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

काँग्रेसची भूमिका तटस्थ

काँग्रेसला विचारात घेऊन सत्ताधारी पॅनेलने पॅनेलची निर्मित्ती केली नाही, त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी अर्ज माघार घेत काँग्रेस या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेत असल्याचे जाहीर केले.

लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सुनील आव्हाड, वाळू जगताप यांच्या उपस्थितीत पिंगळ यांनी भूमिका मांडली. परंतु दिंडोरी शहराध्यक्ष गुलाब जाधव यांच्या पत्नी विमल जाधव यांनी शेतकरी उत्कर्ष पॅनेलकडून उमेदवारी करीत असल्याने काँग्रेसची आगामी भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी उत्कर्ष पॅनेल उमेदवार

सहकारी संस्था (सर्वसाधारण गट) ः दत्तात्रेय रामचंद्र पाटील, चंद्रशेखर हिंमतराव देशमुख, शिवाजी बाबूराव पिंगळ, अनिल सुदामराव देशमुख, रघुनाथ राजाराम मोरे, विलास दिनकर निरघुडे, प्रवीण चंद्रभान संधान.

इतरमागास प्रवर्ग ः प्रवीण एकनाथ जाधव, वि. जा. भ. ज. ः शाम गणपत बोडके, महिला राखीव ः सत्यभामा साहेबराव हिरे, विमल गुलाब जाधव. सर्वसाधारण ः वसंत रामभाऊ जाधव, नरेंद्र सुभाष पेलमहाले

अनु. जा. जमाती ः पांडूरंग काळू टोंगारे, ग्रामपंचायत (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) ः पंडित महादू बागूल, हमाल तोलारी संघ ः सुधाकर प्रभाकर जाधव

परिवर्तन पॅनलचे उमेदवार असे

सहकारी संस्था (सर्वसाधारण) ः प्रशांत प्रकाश कड, कैलास बाबूराव मवाळ, गंगाधर खंडेराव निखाडे, नरेंद्र कोंडाजी जाधव, पांडूरंग निवृत्ती गडकरी, रतन रामदास बस्ते. बाळासाहेब विश्‍वनाथ पाटील.

इतर मागास प्रवर्ग ः दशरथ शिवाजी उफाडे. ः वि. जा. भ. ज ः प्रवीण वसंत केदार. महिला राखीव ः रचना अविनाश जाधव, अर्चना अरुण अपसुंदे. ग्रामपंचायत (सर्वसाधारण) ःयोगेश माधवराव बर्डे, दत्तू नामदेव भेरे. ग्रामपंचायत (अनु. जा. जमाती) ः दत्ता पांडुरंग शिंगाडे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल ः दत्तू चिंतामण राऊत. हमाल तोलारी संघ ः विजय मुरलीधर गोतरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT